You are currently viewing नवीन तलाठी सजा, महसूल मंडळांमुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार – आ.वैभव नाईक

नवीन तलाठी सजा, महसूल मंडळांमुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार – आ.वैभव नाईक

गोठोस मंडळ कार्यालय व खुटवळगाव, आंबडपाल तलाठी कार्यालयाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

कुडाळ

तलाठी कार्यालय ही गावाची शान आहे. नवीन तलाठी सजा व महसूल मंडळांची निर्मिती करण्यात आल्याने या गावांमधील नागरिकांना आता सातबारा व इतर कामे गावातच करणे सोयीची होणार आहे.ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे. कुडाळ तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच नवीन तलाठी सजांमध्ये स्वतंत्र तलाठी पदाची भरती करून स्वतंत्र तलाठी उपलब्ध करून देण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न केले जातील तोपर्यंत ज्या तलाठ्यांवर या नवीन सजांचा कार्यभार देण्यात आला आहे त्यांनी आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडावी व जनतेला संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी केले.

कुडाळ तालुक्यातील गोठोस येथे नवनिर्मित मंडळ कार्यालय, खुटवळगाव येथे नवनिर्मित तलाठी कार्यालय व आंबडपाल येथे नवनिर्मित तलाठी कार्यालयाचे उदघाटन आज आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते व कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी गोठोस येथे शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, जि.प.सदस्य राजू कविटकर, अनुप्रीती खोचरे, कुडाळ पं.स.सभापती नूतन आईर, उपसभापती जयभारत पालव, सदस्य श्रेया परब,योगेश धुरी, रामा धुरी, कृष्णा धुरी, ग्रामसेवक श्री.गावडे, नितीन नाणचे, व ग्रामस्थ
खुटवळगाव येथे पं स सदस्य मिलिंद नाईक, मंडळ अधिकारी चिंतामणी भोगे,ग्रामविकास अधिकारी श्री मोरे,सरपंच राजश्री घावनळकर,उपसरपंच दिनेश वारंग, दिलीप पाटकर, ग्रा.प सदस्य प्राची पाटकर, आरती वारंग, हनुमंत पाटकर, अमरेश बागवे,लक्ष्मण पोकळे,पोलीस पाटील रामचंद्र भोई, कृषी सहाय्यक जागृती शेटये व ग्रामस्थ आंबडपाल येथे माजी जी.प.अध्यक्ष विकास कुडाळकर, संजय गांधी निराधार योजना कुडाळ अध्यक्ष अतुल बंगे, मंडळ अधिकारी प्रकाश पास्ते, आंबडपाल सरपंच प्रशिता नाईक, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच दीपक आंगणे, मुळदे सरपंच गुरुनाथ चव्हाण, पावशी तलाठी विद्या अरदकर, तुळसुली तलाठी बाबासो शिंदे, आंबडपाल ग्रामसेवक मयुरी बांदेकर, पोलीस पाटील सचिन सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष सत्यवान सुपल, मुळदे ग्रामसेवक डी एन सावंत, मुळदे पोलीस पाटील रामदास चव्हाण, बाबुराव नाईक, बाबू चव्हाण, दाजी वारंग, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + one =