You are currently viewing “मी फार मोठा साहित्यिक नाही तर एक साधा साहित्य रसिक आहे” :- नंदकुमार मुरडे

“मी फार मोठा साहित्यिक नाही तर एक साधा साहित्य रसिक आहे” :- नंदकुमार मुरडे

*”मी फार मोठा साहित्यिक नाही तर एक साधा साहित्य रसिक आहे” :- नंदकुमार मुरडे*

चिंचवड-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)
गुरुवार दि. 4 एप्रिल – एस के एफ युनियन हॉल, चिंचवड येथे अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
“मी कवी मस्त आहे, पावसाळी हस्त आहे,” असे आपल्या कवितेतून सांगणारे, पावसाच्या हस्त नक्षत्रा प्रमाणे दमदार आवाज असलेले, कवी लेखक गझलकार, कथाकार, कथाकथनकार, अभिनेते, संपादक, समाजिक कार्यकर्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले श्री नंदकुमार मुरडे सर यांची साहित्यिक वाटचालीवर आधारीत असलेला कार्यक्रम पार पडला.
यावेळी नभा साळसकर, अनुप्रिता साळसकर, अवनी मुरडे, सावी मुरडे, क्रांती पेटेकर, मेधा पिंगळे यांनी कार्यक्रमाच्या स्वागतागीतावर नृत्य सादरीकरण केले. मुरडे यांच्या ‘वर्षानंद’ या पुस्तकातील लेखाचे वाचन, शितल कुलकर्णी यांनी केले. वर्षा बालगोपाल आणि अमृता पेटकर यांनी, मुरडे यांच्या गझलांचे सादरीकरण केले. पुष्पा देशपांडे, विकास कुलकर्णी, अनिल गाडे, श्री इनकर, सुरेखा पेटेकर, अरविंद पेटकर यांनी नंदकुमार मुरडे यांच्या साहित्यिक वाटचाल कशी बहरत गेली, ते आपल्या मनोगतातून सांगितले.
यावेळी गझलपुष्प कला, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक संस्थेच्या वतीने मुरडे सरांच्या संपूर्ण नावातील प्रत्येक अक्षराने सुरू होणारा, मुरडे सरांना समर्पित एक शेर, असे बारा शेर असलेली प्रतिमा, शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन त्यांना गौरवण्यात आले.
नवयुग साहित्य आणि शैक्षणिक मंडळाच्या वतीने मानपत्र व मुरडे दाम्पत्यांना प्रेमाचा आहेर देण्यात आला. या मानपत्राचे वाचन मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घावटे यांनी केले. संचालक मंडळाचे प्रा. तुकाराम पाटील, राज अहेरराव, राजेंद्र घावटे, रमेश वाकनीस, अशोक कोठारी, प्रा. पी.बी. शिंदे, संपत शिंदे, मंगेश पोहणेकर, शरद काणेकर, अरविंद वाडकर, अनिकेत गुहे, माधुरी ओक, अश्विनी कुलकर्णी, माधुरी विधाटे
यांनी मंचावर जाऊन त्यांचा सत्कार केला.

समरसता साहित्य परिषदेच्या वतीने संत ज्ञानेश्वर माऊलींची मुर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

दिलासा संस्था, कलारंजन प्रतिष्ठान, संवेदना प्रकाशन, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती, बंधुता साहित्य परिषद ,शब्दधन काव्यमंच या संस्थां तर्फे लोकमान्य टिळक कृतज्ञता सन्मान देण्यात आला.ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, सुरेश कंक, सुभाष चव्हाण, मधुश्री ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोगदंड, संगीता जोगदंड, प्रकाशक नितीन हिरवे यांनी व्यासपीठावर जाऊन सन्मान केला.
स्वयंसिद्धा प्रतिष्ठान तर्फे पुणेरी शेला व सन्मानपत्र, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सन्मानपत्राचे वाचन संस्थेच्या अध्यक्ष सविता इंगळे यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद व साहित्य दीप पुणे या संस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
सर्वांच्या सत्काराला उत्तर देताना नंदकुमार मुरडे म्हणाले की, “मी काही मोठा साहित्यिक नाही.मी एक साधा साहित्य रसिक आहे. मला अजून खूप साहित्याची सेवा करायची आहे. पिंपरी चिंचवड इथल्या सर्व साहित्य संस्था व साहित्यिकांचे मला भरभरून प्रेम मिळत आहे. हीच माझी जगण्याची ऊर्जा आहे.”
यावेळी अनिल दीक्षित, डॉ. अगरवाल, राधाबाई वाघमारे, उज्वला केळकर, प्रदीप गांधलीकर, राजेंद्र भागवत, कैलास भैरट, शोभा जोशी, मानसी चिटणीस, हेमंत जोशी, जयश्री श्रीखंडे, निलेश शेंबेकर, समृद्धी सुर्वे, दिनेश भोसले, संदीप जाधव, बाबू डिसोजा, माधुरी डिसोजा, प्रशांत पोरे, अभिजीत काळे, निलेश शेंबेकर, संजय खोत, गणेश भुते , ज्योत्स्ना चांदगुडे, मीना शिंदे, श्रीकांत चौगुले, फुलवती जगताप हे पिंपरी चिंचवड चे साहित्यिक उपस्थित होते.
चिंचवड ज्येष्ठ नागरिक मंडळ व मुरडे यांचे नातलग, मित्र परिवार यावेळी उपस्थित होता.
सौ रजनी मुरडे, अमित मुरडे, सुखदा मुरडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यक्रमात मंगलमय वातावरण निर्मितीसाठी तांबोबोळ आणि खटावकर यांनी शंख वादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेधा पिंगळे यांनी केले.

*संवाद मीडिया*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*
https://youtu.be/liBWDGhyPuU

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*

*जाहिरात लिंक*
https://youtu.be/liBWDGhyPuU

https://www.facebook.com/share/v/EhagTUPirL6HH11K/?mibextid=oFDknk
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा