तन आणि मनाचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग -:-प्राचार्य मधुकर खाड्ये

तन आणि मनाचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग -:-प्राचार्य मधुकर खाड्ये

*कोरोनाचे सर्व नियम पाळुन कासार्डे विद्यालयात जागतिक योग दिन साजरा.*

*कासार्डे विद्यालयात  खेळाडूंच्या मनमोहक प्रात्यक्षिकांनी जागतिक योग दिन साजरा!*

तळेरे :

भारतीय प्राचीन संस्कृती मध्ये योग, योगासने, योगसाधना, याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे महाभयंकर सावट घोंगावत असताना जागतिक योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा अंतर्भाव करावा असे आवाहन कासार्डे विद्यालयाचे प्राचार्य एम.डी.खाड्ये यांनी केले आहे.

जागतिक योगदिनाचे औचित्य साधून मोजक्याच विद्यार्थ्यांच्या उपस्थित आयोजित उपक्रमास शुभेच्छा देताना प्राचार्य खाड्ये बोलत होते.

कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जागतिक योग दिन फक्त तीन विद्यार्थी व मोजकेच शिक्षकांनी सामाजिक अंतर राखून, मास्कचा वापर करीत हा योग दिन मोठ्या साजरा केला.

या कार्यक्रमाला स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, प्राचार्य मधुकर खाड्ये, पर्यवेक्षक नारायण कुचेकर, योग शिक्षक संजय भोसले, क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड व अन्य शिक्षकांनी विशेष उपस्थिती दर्शविली होती.

प्रशालेत दोन वर्षांपूर्वी योग दिन १ हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाने साजरा होत असे पण,कोरोनाच्या सावटामुळे सलग दुसऱ्या वर्षी प्रशालेतील फक्त तीन योग खेळाडूं व मोजक्याच शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थित हा योग दिन प्रशालेत परंपरागत पद्धतीने साजरा करण्यात आला.

याप्रसंगी विद्यालयातील योग खेळाडूंनी योग शिक्षक संजय भोसले व क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक अंतर राखून व मास्कचा वापर करून योगाची मनमोहक प्रात्यक्षिके सादर केली.यामध्ये कु.नेहा अजित पाताडे, कु.सानिका प्रविण मत्तलवार व हर्ष सचिन घाडीगांवकर आदी  इयत्ता दहावीतील योग खेळाडूंचा समावेश होता.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा