You are currently viewing विजेच्या धक्क्याने देवगड आनंदवाडीत 1 लाख 33 हजारांचे नुकसान…

विजेच्या धक्क्याने देवगड आनंदवाडीत 1 लाख 33 हजारांचे नुकसान…

विजेच्या धक्क्याने देवगड आनंदवाडीत 1 लाख 33 हजारांचे नुकसान…

देवगड
बुधवारी मध्यरात्री १.०५च्या सुमारास पडलेल्या विजेच्या गडगडाटी पावसात वीज पडून आनंदवाडी येथील दोन घरातील इलेट्रॉनिक उपकरणे जळून १ लाख ३३ हजाराचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी रात्री १.०५ च्या सुमारास घडली.
मंगळवारी सायंकाळी नंतर गडगडाटी पावसास सुरुवात होऊन बुधवारी रात्री विजेचा लखलखाट व गडगडाटी पावसाचे प्रमाण वाढले ,आणि वीज पडून आनंदवाडी येथील कमलाकर ज्ञानदेव मुणगेकर यांचे घरातील विद्युत पंखा, लाईट बल्ब,लाईट बोर्ड,मीटर टीव्ही संच यांचे नुकसान झाले सुमारे १लाख १५ हजार एवढे नुकसान झाले तसेच हरिश्चंद्र दत्तात्रय मुणगेकर यांच्या घरालाही विजेचा धक्का बसून घरातील इन्व्हर्टर बॅटरी निकामी होऊन १८ हजार रुपयांचे नुकसान झाले जामसंडे तलाठी एस.बी.डांगे,यांनी घटनास्थळी जाऊन रीतसर पंचयादी केली आहे.
कुणकेश्वर येथील रवींद्रनाथ रामचंद्र गावकर यांचे घरावर माडाचे झाड पडून विद्युत मीटर वायरिंग चे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.घटनास्थळी कुणकेश्वर तलाठी एस बी नाईक यांनी भेट देऊन रीतसर पंचयादी केली आहे.
बुधवारी सकाळी पर्यंत पडलेल्या पावसाची नोंद २८ मी मी एवढी झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − three =