You are currently viewing कष्टकरी व बळीराजाला चांगले दिवस येऊदे!

कष्टकरी व बळीराजाला चांगले दिवस येऊदे!

*कष्टकरी व बळीराजाला चांगले दिवस येऊदे!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं भराडी देवीला साकडं*

▪️आंगणेवाडी येथे आई भराडी देवीचे घेतले आशीर्वाद

*मालवण*

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सकाळी श्री भराडी देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी आंगणे कुटुंबियांच्या वतीने स्वागत कक्षात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

कष्टकरी व बळीराजाला चांगले दिवस येऊदे. देवीच्या आशीर्वादाने एक सेवक म्हणून राज्याचे काम करण्याची संधी मिळाली आहे.

लाखो भाविक यात्रेला येतात. नवसाला पावणारी देवी अशी ख्याती आहे. आंगणे कुटुंबीय भाविकांना सेवा सुविधा देऊन मोठे काम करत आहेत. शासनाच्या माध्यमातून याठिकाणी सुविधा देण्यासाठी काही कमी पडणार नाही. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना नव्याने सूचना दिलेल्या आहेत. देवीच्या परवानगीने भक्त निवास सुद्धा मार्गी लागेल. देवीचे सत्व आपल्या भक्तांना येथ पर्यंत घेऊन येते. तसाच मी सुद्धा आलो आहे. राज्याचे मुख्यमंत्री पद मिळूण्या मागे भराडी आईचे आशीर्वाद आहेत. सर्व सामान्यांसाठी हे सरकार काम करत आहे, कोकणच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यात येईल. सिंचनासाठी बारमाही पाण्याची व्यवस्था झाल्यास वाहून जाणारे पाणी शेतीस उपयोगी होणार आहे. सिंधुदुर्ग ते मुंबई एक्सप्रेस रस्ता होत आहे. कोकण विकास क्षेत्र प्राधिकारण्याच्या माध्यमातून अनेक सोविधा देण्यात येणार आहेत. आंगणेवाडीसाठी आवश्यक सुविधा सुचवा, सरकार म्हणून कुठे कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजप नेते डॉ. निलेश राणे, आम. रवींद्र फाटक, जिल्हा पोलीस प्रमुख सौरभकुमार अग्रवाल, जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे,तहसीलदार वर्षा झाल्टे, अध्यक्ष भास्कर आंगणे, आनंद आंगणे, बाळा आंगणे, बाबू आंगणे, मधुकर आंगणे आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − five =