You are currently viewing एल एल बी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जमा करा

एल एल बी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जमा करा

स्टुडंट्स असोसिएशनची समाज कल्याण विभागाकडे मागणी

मालवण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एलएलबीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेचे हप्ते खात्यात लवकरात लवकर बँक खात्यात जमा करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन ( मालसा ) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यावतीने जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुरडकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे व विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागातील शिष्यवृत्ती विभागाचे सुनिल बागुल यांना दिले.
विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज करून जवळपास ७ ते ८ महिने झाले. परंतु काही विद्यार्थ्यांना आतापर्यंत शिष्यवृत्तीचा एक सुद्धा हप्ता खात्यात जमा झाला नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित दिसत असून त्याबद्दल योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. काही विद्यार्थ्यांनी २०२० – २१ मध्ये अर्ज करून त्यांचे शैक्षणिक वर्ष पूर्ण होत आले तरी अद्याप त्यांच्या शिष्यवृत्तीबद्दल कोणतीच कार्यवाही झाली नाही. शिष्यवृत्तीचा अर्ज केल्यानंतर शैक्षणिक वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच त्यांना स्कॉलरशिप मिळावी. असे मालसा संघटनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे,

प्रतिक्रिया व्यक्त करा