You are currently viewing कणकवलीत १  जि. प. मतदारसंघाची व त्या अंतगर्तगत २ पं. स. मतदारसंघांची वाढ

कणकवलीत १ जि. प. मतदारसंघाची व त्या अंतगर्तगत २ पं. स. मतदारसंघांची वाढ

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे. कणकवली तालुक्यात एका जि. प. मतदारसंघाची व त्या अंतगर्तगत दोन पं. स. मतदारसंघांची वाढ झाली आहे. परिणामी यापूर्वीच्या जि. प. व पं. स. मतदारसंघांतील गावांमध्ये बदल झाले आहेत. या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती, सूचना मागविण्यात आल्या असून कणकवली तालुक्यातील हरकती, सूचना ८ जूनपर्यंत तहसीलदार यांच्याकडे सादर करायवच्या आहेत.

कणकवली तालुक्यातील जि. प. मतदारसंघांतर्गत दोन्ही पं. स. मतदारसंघांमधील गावे पुढीलप्रमाणे :

🔹खारेपाटण जि. प. मतदारसंघामधील खारेपाटण पं. स. मतदारसंघामध्ये खारेपाटण, शिक्षाजीपेठ, बंदरगांव, संभाजीनगर, काजिर्डे, वायंगणी, चिंचवली, नडगिवे तर वारगांव पं.स. मतदारसंघामध्ये कुरंगवणे, बेर्ले, शेर्पे, शिडवणे, वारगांव, साळीस्ते या गावांचा समावेश आहे.

🔹कासार्डे जि. प. मतदारसंघामधील कासार्डे पं. स. मतदारसंघामध्ये कासार्डे, आनंदनगर, धारेश्वर, उत्तर गांवठण, जांभळगाव, दाबगांव, आवळेश्वर, नागसावंतवाडी, पियाळी तर तळेरे पं. स. मतदारसंघामध्ये तळेरे, औदुंबरनगर, दारूम, ओझरम, आयनल, कोळोशी या गावांचा समावेश आहे.

🔹नांदगांव जि. प. मतदारसंघातील नांदगांव पं. स. मतदारसंघामध्ये नांदगांव, असलदे, तोंडवली, बावशी तर ओटव पं. स. मतदारसंघामध्ये ओटव, माईण, भरणी, सावडाव, बेळणेखुर्द, तिवरे, डामरे या गावांचा समावेश आहे.

🔹फोंडा जि. प. मतदारसंघातील फोंडा पं. स. मतदारसंघामध्ये फोंडा, दक्षिणबाजारपेठ तर लोरे पं. स. मतदारसंघामध्ये लोरे, गांगेश्वर, नविन कुर्ली, वाघेरी, लिंगेश्वर, मठखुर्द, उत्तर बाजारपेठ, ब्रह्मनगरी, घोणसरी या गावांचा समावेश आहे.

🔹हरकुळ बुद्रुक जि. प. मतदारसंघातील हरकुळ बुद्रुक पं. स. मतदारसंघामध्ये हरकुळ बुद्रुक, नागवे, करंजे तर हरकुळ खुर्द पं. स. मतदारसंघामध्ये हरकुळ खुर्द, करूळ, कोंडये, भिरवंडे, रामेश्वरनगर, नेहरूनगर, सुभाषनगर, गांधीनगर, कुंभवडे या गावांचा समावेश आहे.

🔹नाटळ जि. प. मतदारसंघातील नाटळ पं. स. मतदारसंघामध्ये नाटळ, दिगवळे, रांजणगांव, नरडवे, पिंपळगांव, भेरवगांव, जांभळगांव, यवतेश्वरगांव तर सांगवे पं. स. मतदारसंघामध्ये सांगवे, संभाजीनगर, शिवाजीनगर, शास्त्रीनगर, नवानगर, शिवडाव दारिस्ते या गावांचा समावेश आहे.

🔹जानवली जि. प. मतदारसंघातील जानवली पं. स. मतदारसंघामध्ये जानवली, हुंबरट, साकेडी, तरंदळे तर वरवडे पं. स. मतदारसंघामध्ये बिडवाडी, हुंबरणे, वरवडे, फणसनगर, पिसेकामते या गावांचा समावेश आहे.

🔹कलमठ जि. प. मतदारसंघातील कलमठ पं. स. मतदारसंघामध्ये कलमठ तर वागदे पं. स. मतदारसंघामध्ये आशिये, सातरल, कासरल, वागदे गावांचा समावेश आहे.

🔹कळसुली जि. प. मतदारसंघातील कळसुली पं. स. मतदारसंघामध्ये कळसुली, लिंगेश्वरनगर, पिंपळेश्वरनगर, उल्हासनगर, उपनगर, श्रीनगर, उत्तमनगर, राजनगर, शिरवल, हळवल तर ओसरगांव पं. स. मतदारसंघामध्ये ओसरगांव, बोर्डवे कसवण, तळवडे गावांचा समावेश आहे.

दरम्यान ८ जून नंतर हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, अशी माहितीही देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + seven =