You are currently viewing जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

300 पेक्षा अधिक खेळाडुंनी विविध खेळांचे गिरवले धडे!

 

तळेरे : प्रतिनिधी

 

खेळाच्या प्रचार व प्रसार यानुसार फक्त खेळाडूंचा जास्तीत जास्त सहभाग व संघाची संख्या वाढवणे यावर लक्ष केंद्रित न करता गावपातळी पासून चांगले खेळाडू तयार होण्यासाठी वयवर्ष 8 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तर, जिल्हास्तरावर खेळ निहाय व शारीरिक क्षमता (Physical Fitness) खेळांचे प्राथमिक कौशल्यांचा विकासासाठी तसेच खेळामध्ये सहभाग वाढून, शारीरिक क्षमता, शारीरिक सुदृढता यामध्ये वाढ होण्यासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे दि. 17 ते 27 एप्रिल 2023 या कालावधीत जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर तसेच जिल्हा क्रीडा संकुलात आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला जिल्ह्यातील बच्चेकंपनीने उस्फुर्त प्रतिसाद देत विविध खेळातील कौशल्यांचे धडे गिरवले आहेत. या दहा दिवसांच्या शिबीरात विविध खेळांमधुन 300 पेक्षा अधिक विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

सदरचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्षा व जिल्हाधिकारी श्रीम.के. मंजुलक्ष्मी व जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम. विदया शिरस तसेच श्री.शाम देशपांडे (तालुका क्रीडा अधिकारी कणकवली), श्री. विजय शिंदे (तालुका क्रीडा अधिकारी, वेंगुर्ला) श्रीम.मनिषा पाटील (क्रीडा अधिकारी) यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली जिल्हाभर विविध केंद्रांवर यशस्वीपणे पार पडले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग द्वारा आयोजित या शिबिराचे नियोजन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम.विद्या शिरस यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्ह्यातील विविध खेळांच्या असोसिएशनच्या विशेष सहकार्याने झाले होते.

मल्लखांब व बास्केटबॉल या खेळाचे प्रशिक्षण शिबिर जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल मालवण येथे आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिर हे सिंधुदुर्ग जिल्हा मल्लखांब असोसिएशन व बास्केटबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विदयमानाने श्री. शांताराम जोशी, श्री रणवीर सावंत व श्री.दिनेश चव्हाण यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली घेतले गेले. तर बॉक्सिंग या खेळाचे प्रशिक्षण शिबिर जिल्हा क्रीडा संकुल, ओरोस येथे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनचे खजिनदार श्री.एकनाथ चव्हाण, श्री. स्वप्नील चव्हाण तसेच महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. भरत वावळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.तसेच कबड्डी या खेळाचे प्रशिक्षण कबड्डी खेळाच्या राष्ट्रीय खेळाडु श्रीम. अॅलीक्सा अल्मेडा यांनी जिमखाना स्टेडीयम नगरपरिषद,सावंतवाडी येथे घेतले तर वेटलिप्टींग या खेळाचे प्रशिक्षण तालुका क्रीडा अधिकारी वेंगुर्ला श्री. विजय शिंदे, व क्रीडा शिक्षक श्री.संजय पेंडुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वराडकर हायस्कुल कट्टा, ता. मालवण येथे संपन्न झाले. याशिवाय बुध्दीबळ या खेळाचे प्रशिक्षण ‘श्री चेस अकॅडमी कणकवली यांचे संयुक्त विदयामानाने श्री.श्रीकृष्ण आडेलकर यांनी ऑनलाईन पध्दतीने खेळाडूंना विशेष प्रशिक्षण दिले. तर कॅरम या खेळाचे प्रशिक्षण सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशन चे राष्ट्रीय पंच व सचिव श्री. योगेश फणसळकर तसेच त्यांचे सहकारी श्री प्रतिक बांदेकर, श्री.रोहन राजाध्यक्ष व श्री.राजेश निर्गुण यांनी श्री पंचम खेमराज हायस्कुल, सावंतवाडी या ठिकाणी घेतले.

लहानपणापासून प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःचे संरक्षण स्वतः करता येण्यासाठी तसेच कराटे या खेळातील विविध कौशल्ये आत्मसात करता यावीत यासाठी कराटे या खेळाच्या प्रशिक्षणाचे आयोजन कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे येथे करण्यात आले होते.या प्रशि‌क्षण वर्गाला कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र , इंडियन गेन्श्युरियो कराटे डो ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच सेन्साई राजेश गाडे (मुंबई) व सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव तथा राष्ट्रीय पंच श्री. दत्तात्रय मारकड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.तसेच जिल्हात जास्तीत जास्त अॅथलॅस्टिक तयार व्हावेत,

यासाठी अॅथलॅटिक्स या क्रीडा प्रकारच्या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे करण्यात आले होते.या शिबीराला एन.आय.एस. कोच श्री. ताराचंद पाटकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. जिल्हा क्रीडा परिषदेच्या अध्यक्षा तथा जिल्हा अधिकारी श्रीम.के. मंजूलक्ष्मी, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम.विद्या शिरस यांनी उन्हाळी शिबिरात सहभागी झालेल्या सर्व शिबीरार्थी खेळाडूंचे अभिनंदन करुन त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विविध असोसिएशनच्या व प्रशिक्षकांनी दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल सर्वांना विशेष धन्यवाद देत यापुढेही असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 8 =