You are currently viewing सातार्डा हायस्कूल येथे भव्य रक्तदान शिबिर

सातार्डा हायस्कूल येथे भव्य रक्तदान शिबिर

सातार्डे मध्यवर्ती संघ मुंबई संचलीत म. गां. वि. मं. हायस्कूल सातार्डा शाळेचा “हिरक महोत्सव” (६० वर्षे) वर्षाचे औचित्य साधून संजय पिळणकर व मित्रमंडळ यांच्या संकल्पनेतून, माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजता सातार्डा हायस्कूल येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. तरी या रक्तदान शिबिराला सर्व माजी विद्यार्थी व मित्र मंडळ यांनी शिबिरात भाग घेऊन रक्तदान करून शाळेचे हे हिरक महोत्सवी वर्ष साजरे करावे आणि त्याची शान वाढवावी असे, आवाहन संजय पिळणकर व मित्रमंडळ यांनी केले आहे.

इच्छुक रक्तदात्यांनी डी.एन. मांजरेकर सर 9421265751, पप्पी कवठणकर 9545837182 / 8329437569, उमेश कांबळे 7798928114, रुपेश साळगावकर 9823841284, बाबली गवंडे 8390905269 यांच्याशी संपर्क साधावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 15 =