सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या मृत्युंजय दुतानी केलं प्रशिक्षित वाहन चालकांना मार्गदर्शन.
सावंतवाडी
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ही सावंतवाडी शहरातील एक रजिस्टर सेवाभावी संस्था आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आरोग्य या क्षेत्रामध्ये नेहमी कार्यरत असते. सतत आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत राहून संस्थेतील कार्यकर्त्यांनी आजपर्यंत 34 अपघातग्रस्तांचे प्राण वाचून प्रसंगी त्यांचे नातेवाईक बनवून त्यांना जीवदान दिले आहे तसेच रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत सावंतवाडी शहरांतर्गत आजारी तसेच अपघात ग्रस्त व्यक्तींसाठी *जीवनरक्षक* ही संकल्पना देखील ते शहरात विनामूल्य राबवत आहेत.
याची दखल घेऊन नुकताच सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस यांच्या एका कार्यक्रमात मृत्युंजय दूत म्हणून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला एक नवीन ओळख दिली आहे.
आज सावंतवाडी रेस्ट हाऊस येथे वाहन टेस्ट कॅम्पच्या दरम्यान सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पराग मातोंडकर व सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अमित नायकवडी यांनी प्रशिक्षित विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शनासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रवी जाधव व रूपा मुद्राळे यांना निमंत्रित केले होते त्याप्रसंगी वाहन चालवताना वाहन चालवतेवेळी काय खबरदारी घेतली पाहिजे तसेच अपघाताप्रसंगी अपघातग्रस्ताला प्राथमिक मदत कशाप्रकारे केली पाहिजे तसेच मोटर वाहन कायद्याच्या कलम 134A नुसार अपघात ग्रस्त व्यक्तीला सद्भावनेने मदत करणाऱ्या व्यक्तीला कायदेशीर संरक्षण मिळते याबाबतची सविस्तर माहिती व मार्गदर्शन रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी प्रशिक्षित विद्यार्थ्यांना केलं. उपस्थित प्रशिक्षित विद्यार्थी व मोटर वाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक पराग मातोंडकर तसेच मोटर वाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक नायकवडी यांनी या मार्गदर्शनाला भरभरून दात दिली व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.
