You are currently viewing आंबोलीत महिलेचे प्राण वाचविणाऱ्या दत्ता देसाईंचा ग्रामस्थांकडून सत्कार…

आंबोलीत महिलेचे प्राण वाचविणाऱ्या दत्ता देसाईंचा ग्रामस्थांकडून सत्कार…

आंबोली

येथील हिरण्यकेशी नदीपात्रातून पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या महिलेचे प्राण वाचविल्याबद्दल पोलीस दत्ता देसाई यांचे आंबोली ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना विभागीय अध्यक्ष बबन गावडे यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, तर गेळे येथील ग्रामस्थांनी हनुमानाची मूर्ती भेट दिली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य काशीराम राऊत, पत्रकार अनिल चव्हाण, विजय राऊत, आंबोली दूरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित गोते, सामाजिक कार्यकर्ते सागर ढोकरे, बाबुराव गवस, रंजन बंड, तुषार बंड आदी उपस्थित होते.
आंबोली येथील हिरण्यकेशी नदीपत्रात कणकवलीतील एक पर्यटक महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली होती. सुदैवाने तिच्या हाती झाडी लागल्यामुळे पुराच्या पाण्यात “त्या” स्थिरावल्या. मात्र प्रवाह मोठा असल्यामुळे त्यांना पुरा बाहेर येत नव्हते. यावेळी पाण्यात उतरण्याचे कोणीच धैर्य दाखवले नाही. यावेळी त्या ठिकाणी पोलीस श्री. देसाई आल्यानंतर त्यांनी तिच्या पतीचा व मुलाचा आक्रोश पाहून स्वतःचा जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यात उडी टाकली. व सुखरूप” त्या” महिलेला बाहेर काढले. याच पार्श्वभूमी त्यांनी एका महिलेचा जीव वाचवल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 5 =