You are currently viewing मराठी संगीत नाटकाच्या प्रचारासाठी भव्य रील स्पर्धा!

मराठी संगीत नाटकाच्या प्रचारासाठी भव्य रील स्पर्धा!

मराठी संगीत नाटकाच्या प्रचारासाठी भव्य रील स्पर्धा!

श्री परमेश्वर प्रॉडक्शनचा पुढाकार; ३ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक, १४ ते २५ नोव्हेंबरदरम्यान स्पर्धा

सावंतवाडी :

मराठी संगीत रंगभूमीचा समृद्ध वारसा जपण्यासाठी आणि तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी श्री परमेश्वर प्रॉडक्शन, सावंतवाडी यांच्या वतीने ‘नाट्यपरिक्रमा – २०२६’ निमित्त भव्य रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

🎭 स्पर्धेचा विषय : मराठी संगीत नाटक
स्पर्धकांना ३० ते ९० सेकंदांची आकर्षक रील तयार करायची असून त्यामध्ये पुढील विषय मांडता येणार आहेत.

मराठी संगीत नाटकाचा इतिहास व परंपरा.
अजरामर नाट्यपदे आणि संगीताचा वारसा.
संगीत रंगभूमीचे सांस्कृतिक महत्त्व.
नव्या पिढीला संगीत नाटकाची गोडी लागण्यासाठीचे विचार.
‘नाट्यपरिक्रमा – २०२६’चा उद्देश आणि तीन संगीत नाटकांच्या प्रयोगांची माहिती.

🏆 पारितोषिके
प्रथम क्रमांक – ३,००० रुपये
द्वितीय क्रमांक – २,००० रुपये
तृतीय क्रमांक – १,००० रुपये

📌 स्पर्धेचे महत्त्वाचे नियम
स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
एका स्पर्धकाची एकच रील ग्राह्य धरली जाईल.

रील श्री परमेश्वर प्रॉडक्शनच्या Instagram पेजसोबत Collab करून पोस्ट करावी.
रील पोस्ट केल्यानंतर नावनोंदणी करून लिंक द्यावी.
Views किंवा Likes यांच्या आधारे विजेत्यांची निवड होणार नाही.

कॉपीराइट नियमांचे पालन करणे आवश्यक असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

📅 स्पर्धेचा कालावधी : १४ ते २५ नोव्हेंबर २०२६
🎭 नाट्यपरिक्रमा – २०२६
दिनांक : रविवार, २९ नोव्हेंबर २०२६
स्थळ : बॅ. नाथ पै सभागृह, सावंतवाडी

विशेष आकर्षण : एकाच दिवसात तीन अभिजात मराठी संगीत नाटकांचे पूर्ण लांबीचे प्रयोग.

📞 अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी संपर्क :
निरज भोसले – ९०११६०४५०९
तेजस प्रभूदेसाई – ८८०५७८०५८७

मराठी संगीत रंगभूमीचा गौरवशाली वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री परमेश्वर प्रॉडक्शनच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा