You are currently viewing सातत्याने भेटण्यात जिवंत राहण्याचे भाग्य मिळते – गझलकार म.भा.चव्हाण

सातत्याने भेटण्यात जिवंत राहण्याचे भाग्य मिळते – गझलकार म.भा.चव्हाण

पुणे :

निष्ठेने आणि सातत्याने साहित्य सम्राटचे विनोद अष्टुळ हे मराठी भाषेचे कार्यक्रम घेत असतात. साहित्य सम्राट हि संस्था नाही तर चळवळ आहे. त्यांनी आतापर्यंत नाबाद दोनशे बत्तीस कार्यक्रम घेतले आहेत. येथे जाती धर्म असे काही न पाहता माणसांचे साहित्य पाहिलं जातं. आत्ताच्या पिढीची मागणी वेगळी आहे. मराठी साहित्य जागतिक का नाही. कारण मराठी कवी काल्पनिक आणि मनोरंजनात्मक जास्त लिहितो. आपण आपल्या अक्षरांची उंची वाढवली पाहिजे. कोणी सत्कार, सन्मान करो वा ना करो आपण चांगले, कसदार, विज्ञानवादी लेखन केले पाहिजे. यापुढे पुस्तक शिल्लक राहणार नाही. फक्त माणूसच माणसाबरोबर शिल्लक राहणार आहे म्हणून जे काय द्यायचे ते जागतिक दर्जाचे असलं पाहिजे. असे विचार अध्यक्षीय मनोगतातून चव्हाण यांनी व्यक्त केले.

साहित्य सम्राट पुणे संस्थेचे नाबाद २३२ वे शब्द गोड दिवाळी कवी संमेलन साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दलित स्वयंसेवक संघ मुख्यालय नेहरू स्टेडियम स्वारगेट पुणे येथे आयोजित केले होते.

कार्यक्रमासाठी कवीसंमेलनाचे अध्यक्ष म.भा.चव्हाण, प्रमुख पाहुण्या साहित्यिका सु.भा.लोंढे. ज्येष्ठ ग्रंथपाल सदानंद माळी, दैनिक केसरीचे पत्रकार अमोल भोसले, डी.एस.एस.चे.माजी.संघप्रमुख दादासाहेब सोनवणे, साहित्य सम्राट पुणेचे संस्थापक विनोद अष्टुळ आणि निवेदक रानकवी जगदीप मंचावर उपस्थित होते.

मंचावरील मान्यवरांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून साहित्यिकांचे कौतुक करून विशेष मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या सत्कार समारंभानंतर शब्द- गोड – दिवाळी कवीसंमेलन काव्य गीताने चांगलेच रंगले. प्रत्येक कवी कवयित्रींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र आणि सत्यांश दिवाळी विशेषांक देऊन सन्मानित करण्यात आले.

कला – काव्य – फराळ या विशेष वार्षिक कवी संमेलनामध्ये कवी- कवयित्री माननीय दशरथ दुनघव, बाबा ठाकूर, शाम गाडे, पार्थ धडे, श्रीराम धडे, श्रीकांत ढोबळे, रमाकांत ढोबळे, अमोल भोसले, खलील शेख, ॲड.रामचंद्र पाचुणकर, सागर सोनवणे, चांगदेव आढागळे, सुनील जोशी, ऊर्मिला पवार, वृंदा गंभीर, प्राजक्ता गंभीर, अरुण घोडके, ॲड.ड रमाकांत आदमाने, सु.भा.लोंढे, कांचन मून, सुजाता नानेकर, विजय जाधव, सुजित रणदिवे, सदानंद माळी, दादासाहेब सोनवणे, जगदीप वनशिव आणि विनोद अष्टुळ अशा अनेक कवी कवयित्रींनी आपल्या विविध विषयांवरिल कविता गाणी सादर करून सभागृहाची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद अष्टुळ, सुजित रणदिवे यांनी, सूत्रसंचालन जगदीश वनशिव यांनी आणि दादासाहेब सोनवणे यांनी आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा