You are currently viewing संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी दोडामार्ग तालुक्यात मका लागवडीला प्रोत्साहन

संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी दोडामार्ग तालुक्यात मका लागवडीला प्रोत्साहन

संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी दोडामार्ग तालुक्यात मका लागवडीला प्रोत्साहन

कोलझर येथे पशुपालक शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वाटप; माजी उपसभापती गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते वितरण

दोडामार्ग :

संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग व पंचायत समिती दोडामार्ग यांच्या वतीने तालुक्यात मका लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. या उपक्रमाला प्रतिसाद देत दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मका लागवड करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
शेतकऱ्यांना सहकार्य व प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने कोलझर पशुवैद्यकीय दवाखान्यात मका बियाण्यांचे वाटप करण्यात आले. माजी उपसभापती गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते हे बियाणे वितरित करण्यात आले.
यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वझरेकर, उल्हास देसाई, उदय देसाई, विठ्ठल बोर्डेकर, राजा सुतार, मुंगी तसेच परिसरातील पशुपालक शेतकरी उपस्थित होते.
जनावरांसाठी भविष्यात चारा उपलब्ध व्हावा आणि संभाव्य चारा टंचाईवर वेळीच मात करता यावी, या दृष्टीने मका लागवडीचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा