मालवणमध्ये २८ नोव्हेंबरला खुले स्थानिक कवी संमेलन
नाथ पै सेवांगणचा उपक्रम; नवोदित व प्रस्थापित कवींना कविता सादरीकरणाची संधी
मालवण
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन २०२६ निमित्त शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी खुले स्थानिक कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
सायंकाळी ४ ते ५.३० या वेळेत धुरीवाडा, चिवला बीच येथील सेवांगणमध्ये हे संमेलन होणार आहे. मालवण व परिसरातील नवोदित तसेच प्रस्थापित कवी-कवयित्रींना आपल्या स्वरचित कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे.
इच्छुकांनी आपली स्वरचित कविता व संक्षिप्त परिचय ऋतुजा केळकर यांच्या व्हॉट्सॲप क्रमांक ९४२०४२३७९० वर पाठवून नावनोंदणी करावी. या साहित्यिक उपक्रमात कवी-कवयित्रींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सेवांगणचे अध्यक्ष डॉ. देवदत्त परुळेकर यांनी केले आहे.
