You are currently viewing कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगांव चा वर्धापन दिन व स्मृतिदिन उत्साहात संपन्न

कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगांव चा वर्धापन दिन व स्मृतिदिन उत्साहात संपन्न

सावंतवाडी : शासनमान्य कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगांव येथे संस्थेचा वर्धापन दिन व संस्थेचे प्रेरणास्थान कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर यांचा स्मृतिदिन सोमवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला.

या पावन प्रसंगी कै. प्रा. उदय खानोलकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच वर्धापन दिनाचे औचित्य साधून विद्येची देवता सरस्वती मातेच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी वाचन मंदिराचे सन्माननीय संचालक श्री. हेमंत खानोलकर, श्री. शांताराम विठ्ठल गवंडे, श्री. चंद्रकांत भोजू जाधव, कार्यवाह सौ. स्नेहा महेश खानोलकर, निवृत्त जिल्हा कामगार अधिकारी श्री. शेखर पाडगावकर, सनदी लेखापाल श्री. श्रीपाद काणेकर, सौ. रंजनाताई काणेकर यांची विशेष उपस्थिती लाभली.

यासोबतच ग्रंथपाल श्री. आनंद देवळी, ग्रंथालय कर्मचारी, असंख्य वाचक, हितचिंतक, देणगीदार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व संस्मरणीय वातावरणात पार पडला.

वाचन संस्कृतीचा हा दीप असाच तेवत राहो, या सदिच्छेसह कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा