यशवंतगड किल्ल्यावर शिवजयंती साजरी…

यशवंतगड किल्ल्यावर शिवजयंती साजरी…

वेंगुर्ले
किल्ले यशवंतगड रेडी येथे काल शिवप्रेमी यशवंत गड, दुर्गवीर प्रतिष्ठान आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती ( तिथी नुसार) साजरी करण्यात आली आहे. हिंदू धर्मात तिथीला अनन्यसाधारण महत्व असून, हिंदूचे आदरस्थान असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जन्म फाल्गुन कृष्ण तृतीया या तिथीला झाला होता. दरवर्षी या दिवशी मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी कडून शिवजयंती साजरी केली जाते. यावर्षी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता शिवजयंती उत्सव अगदी साध्या पद्धतीत साजरा करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा