You are currently viewing ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्जदारांना व्याजात ५० टक्के सवलत

ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्जदारांना व्याजात ५० टक्के सवलत

सिंधुदुर्ग :

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित व त्याची उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग (ओबीसी महामंडळ) यांच्यामार्फत व्यवसायासाठी विविध कर्ज योजनांचा लाभ घेतलेल्या थकीत कर्जदारांसाठी एकरकमी परतावा (One Time Settlement) योजना राबविण्यात येत असल्याचे जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी कळविले आहे.

महामंडळाच्या दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या परिपत्रकानुसार, संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याजाच्या रकमेवर ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही योजना दि. ३१ मार्च २०२७ पर्यंत लागू राहणार आहे.

जिल्ह्यातील महामंडळाच्या माध्यमातून मुदती कर्ज, बीज भांडवल कर्ज, स्वर्णिमा कर्ज योजना, मार्जिन मनी कर्ज योजना आदी योजनांचा लाभ घेऊन व्यवसाय उभारलेले आणि कर्जाची थकबाकी असलेले लाभार्थी या योजनेस पात्र आहेत. संबंधित थकीत कर्जदारांनी योजनेचा लाभ घेऊन कर्जाची थकबाकी एकरकमी भरून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेची अधिक माहिती तसेच आवश्यक कार्यवाहीसाठी जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी, ओरोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा. तसेच जिल्हा व्यवस्थापक यांचा भ्रमणध्वनी ८६६८८९८९५० किंवा कार्यालयीन दूरध्वनी ०२३६२-२२८११९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा