आता Whatsapp वर पाहता येणार PNR स्टेटस

आता Whatsapp वर पाहता येणार PNR स्टेटस

 

वृत्तसंस्था:

आता Whatsapp वर पाहता येणार PNR स्टेटस, भारतीय रेल्वेकडून सुविधा उपलब्ध

रेल्वेने याबाबत नुकतीच माहिती दिली आहे. रेल्वे प्रवाशांना आता व्हॉट्सअ‍ॅपवर रिअल-टाईम पीएनआर स्टेटस तसेच अन्य प्रवासाशी संबंधित माहिती मिळू शकेल.

WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच नवीन वैशिष्ट्ये घेऊन येतो. हे अ‍ॅप लोकांच्या अनेक गरजा पूर्ण करते. देशात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. अशा परिस्थितीत, आरक्षित तिकीटाचे स्टेटस तपासणे हे एक मोठं आव्हान आहे. आता भारतीय रेल्वे तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर PNR स्टेटस पाठणार आहे.

 

प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेता रेल्वे विभागाने काही सोयीस्कर बदल केले आहेत. याद्वारे, रेल्वेच्या वेळेत बदल अथवा ट्रेन रद्द झाल्यास ही माहिती तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार आहे. यासाठी फक्त एकच गोष्ट करावी लागेल ती म्हणजे ट्रेनचे तिकीट काढताना तुमचा संपर्क क्रमांक म्हणून स्वतःचा मोबाईल नंबर नोंदवावा.

रेल्वेने याबाबत नुकतीच माहिती दिली आहे. रेल्वे प्रवाशांना आता व्हॉट्सअ‍ॅपवर रिअल-टाईम पीएनआर स्टेटस तसेच अन्य प्रवासाशी संबंधित माहिती मिळू शकेल. माहितीनुसार, आपल्याला आपल्या मोबाइलवर एक नंबर (9881193322) फीड करावा लागेल. यानंतर, आपल्याला या क्रमांकावर आपला पीएनआर नंबर पाठवावा लागेल. यानंतर, पडताळणीसाठी विचारलेली माहिती भरा. असे केल्यावर तुम्हाला वेळोवेळी व्हॉट्सअ‍ॅपवर तुमच्या प्रवासाशी संबंधित सर्व अपडेट्स मिळतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा