You are currently viewing रोजगार महाकुंभ मेळाव्यास जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे

रोजगार महाकुंभ मेळाव्यास जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे

रोजगार महाकुंभ मेळाव्यास जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे

  सिंधुदुर्ग

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्यभर मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ अंतर्गत ५०० हून अधिक ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहे.

            या रोजगार मेळाव्यांसाठी आतापर्यंत ८६ उद्योजक व कंपन्यांनी १ हजार ६१६ रिक्तपदे अधिसूचित केली आहेत. विविध नामांकित कंपन्या व आस्थापनांमार्फत विविध पदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोजगार मेळाव्यांची ठिकाणे

अ.क्र. तालुका रोजगार मेळाव्याचे ठिकाण उद्योजक/कंपन्या उपलब्ध रिक्तपदे
१ सावंतवाडी टोपीवाला स्मारक तंत्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी ८ १२८
२ कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ १३ २५७
३ दोडामार्ग दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, दोडामार्ग ८ १७०
४ वैभववाडी अनगरसिद्ध खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगुळवाडी, ता. वैभववाडी ८ ६०
५ सावंतवाडी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडी १० २९३
६ कणकवली आर्टस अँड कॉमर्स कॉलेज, फोंडाघाट ८ ८६
७ कणकवली एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कणकवली ६ १३३
८ कुडाळ श्री. पुष्पसेन सावंत कृषी/फार्मसी/नर्सिंग महाविद्यालय, वाडी हुमरमळा (डिगस) २ ४४
९ मालवण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालवण ८ १३६
१० देवगड श्री. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड ८ ८७
११ वेंगुर्ला प्रादेशिक फळ प्रक्रिया संशोधन केंद्र, वेंगुर्ला ६ २२२

            जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्थानिक तरुण-तरुणींनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि नोंदणी करून मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. अमिन इ. तडवी, प्रभारी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

नोंदणीसाठी संबंधित QR कोड स्कॅन करून सहभाग नोंदवावा.

            अधिक माहितीसाठी वरील कार्यक्रमस्थळी किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा. कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२३६२-२२८८३५ आहे. तसेच कार्यालयाच्या ‘sindhudurgrojgar’ या फेसबुक व इन्स्टाग्राम पेजला भेट द्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा