You are currently viewing बांदा केंद्रशाळेच्या शिक्षिका शुभेच्छा सावंत यांनी आईच्या जन्मदिनी शाळेला दिली मदत….

बांदा केंद्रशाळेच्या शिक्षिका शुभेच्छा सावंत यांनी आईच्या जन्मदिनी शाळेला दिली मदत….

बांदा

बांदा नं. १केंद्रशाळेच्या शिक्षिका श्रीमती शुभेच्छा कृष्णा सावंत यांनी आपल्या मातोश्री प्रभावती कृष्णा सावंत भोसले माजगाव यांच्या जन्मदिनानिमित्त बांदा नं. १ केंद्रशाळेला ५००१/-रुपयांची देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
प्रभावती सावंत भोसले या नेहमी गरजू लोकांना हातभार लावत असत, आपल्या मातोश्रीच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा सावंत यांनी शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करणेसाठी मुख्याध्यापक सरोज नाईक यांचेकडे ही रक्कम सुपूर्द केली यावेळी चिरंजीव वेदांत संदीप सावंत, शिक्षक श्री जे. डी .पाटील,उर्मिला मोर्ये उपस्थित होते.
बांदा केंद्रशाळेत लोकसहभागातून लाॅकडाऊन कालावधीत रंगरंगोटी व भौतिक सुविधा पूर्ण करणेचे काम पूर्णत्वास येत असून या कालावधीत जवळपास तीन लाखांचा शैक्षणिक उठाव करण्यात आला.
सावंत मॅडम यांनी केलेल्या या मदतीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व पालक वर्गाकडून कौतूक करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − 2 =