रोजगार महाकुंभ मेळाव्यास जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे
सिंधुदुर्ग
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्यभर मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ अंतर्गत ५०० हून अधिक ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यांसाठी आतापर्यंत ८६ उद्योजक व कंपन्यांनी १ हजार ६१६ रिक्तपदे अधिसूचित केली आहेत. विविध नामांकित कंपन्या व आस्थापनांमार्फत विविध पदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोजगार मेळाव्यांची ठिकाणे
| अ.क्र. | तालुका | रोजगार मेळाव्याचे ठिकाण | उद्योजक/कंपन्या | उपलब्ध रिक्तपदे |
| १ | सावंतवाडी | टोपीवाला स्मारक तंत्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी | ८ | १२८ |
| २ | कुडाळ | संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ | १३ | २५७ |
| ३ | दोडामार्ग | दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, दोडामार्ग | ८ | १७० |
| ४ | वैभववाडी | अनगरसिद्ध खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगुळवाडी, ता. वैभववाडी | ८ | ६० |
| ५ | सावंतवाडी | यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडी | १० | २९३ |
| ६ | कणकवली | आर्टस अँड कॉमर्स कॉलेज, फोंडाघाट | ८ | ८६ |
| ७ | कणकवली | एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कणकवली | ६ | १३३ |
| ८ | कुडाळ | श्री. पुष्पसेन सावंत कृषी/फार्मसी/नर्सिंग महाविद्यालय, वाडी हुमरमळा (डिगस) | २ | ४४ |
| ९ | मालवण | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालवण | ८ | १३६ |
| १० | देवगड | श्री. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड | ८ | ८७ |
| ११ | वेंगुर्ला | प्रादेशिक फळ प्रक्रिया संशोधन केंद्र, वेंगुर्ला | ६ | २२२ |
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्थानिक तरुण-तरुणींनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि नोंदणी करून मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. अमिन इ. तडवी, प्रभारी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
नोंदणीसाठी संबंधित QR कोड स्कॅन करून सहभाग नोंदवावा.
अधिक माहितीसाठी वरील कार्यक्रमस्थळी किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा. कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२३६२-२२८८३५ आहे. तसेच कार्यालयाच्या ‘sindhudurgrojgar’ या फेसबुक व इन्स्टाग्राम पेजला भेट द्यावी.
