You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा सेवा निवृत्त सैनिक संघ, दोडामार्ग शाखेच्या वतीने “गेट- टूगेदर”

सिंधुदुर्ग जिल्हा सेवा निवृत्त सैनिक संघ, दोडामार्ग शाखेच्या वतीने “गेट- टूगेदर”

चंदू रॉयल पाम, दोडामार्ग येथे होणार कार्यक्रम : माजी सैनिक व कुटुंबीयांना उपस्थित राहण्याचे आवाहन*

दोडामार्ग

सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघसिंधुदुर्ग, शाखा दोडामार्गच्या वतीने सैनिक व त्यांच्या परिवार साठी सामाजिक बांधिलकी जोपासत गेट-टुगेदर चे आयोजन दिन १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते संध्या. ४.३० यावेळेत चंदू रॉयल पाम, दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आला आहे.

सैनिक व त्यांचा परिवार मिळून बहुसंखेने लोक ह्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. एकमेकांच्या ओळखी सोबत स्वादिष्ट भोजन व मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेले आहेत.

याची माहिती आयोजक सिंधुदुर्ग सेवानिवृत्त सैनिक संघ शाखा दोडामार्ग चे अध्यक्ष कृष्णा गवस, वसंत मोर्लेकर, सचिव शंकर गवस, खजिनदार भिकाजी कोकरे , संदीप नाईक, संभाजी डांगे, राजन नाईक, जयराम सावंत, रतन गवस, राजेश गवस तसेच महीला बचत गट पदाधिकारी सौ. दिप्ती मयेकर, सौ.सुनंदा धर्णे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 10 =