You are currently viewing नाम.दीपक केसरकर उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

नाम.दीपक केसरकर उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

सावंतवाडीतील विविध विकास कामांचे करणार भूमिपूजन

महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री नाम.दीपक केसरकर यांचा उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौरा असून सावंतवाडी नगरपालिकेच्या शहरातील विविध विकासकामांच्या भूमीपूजन कार्यक्रमास त्यांची उपस्थिती असणार आहे.
सावंतवाडी नगरपालिका क्षेत्रातील पुढीलप्रमाणे विविध विकासकामांची भूमिपूजन नाम.दीपक केसरकर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहेत. नगरोत्थान जिल्हास्तर योजनेतून मंजूर ओम गणेश सोसायटीच्या मागील गार्डनमध्ये ओपन जिम, खेळणी बसविणे, जिमखाना लाखे वस्तीमध्ये अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण व गटार बांधकाम करणे (विशेष वैशिष्ठ्यपूर्ण योजनेअंतर्गत), सावंतवाडी नगरपालिकेच्या बहुउद्देशीय सभागृहामध्ये बॅडमिंटन कोर्ट तयार करणे (आमदार स्थानिक विकास कार्यक्रम), सावंतवाडी शहरातील मोती तलावामधील निरीक्षण कट्ट्यावर (केशवसुत कट्टा) बैठक व्यवस्था व पेव्हर ब्लॉक बसविणे (आमदार स्थानिक विकास कार्यक्रम), सावंतवाडी नगरपालिका हद्दीतील बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर लगतच्या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे (स्थानिक आमदार विकास कार्यक्रम) इत्यादी विकासकामांची भूमीपूजने होत आहे.
सावंतवाडी शहराचा रखडलेला विकास पुन्हा एकदा नाम.दीपक केसरकर हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समाविष्ट झाल्यावर सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − nine =