You are currently viewing शिक्षणाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाविरोधात प्राथमिक शिक्षक संघटनाचे आंदोलन सुरू

शिक्षणाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाविरोधात प्राथमिक शिक्षक संघटनाचे आंदोलन सुरू

सिंधूदुर्गनगरी
प्राथमिक शिक्षण विभागाने ५० टक्के शिक्षक उपस्थिती व सर्वकष मूल्यमापन बाबत काढलेल्या आदेशा विरोधत आक्रमक झालेल्या जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सर्व संघटना जिल्ह्याच्या राजधानीत एकवटल्या आहेत. मोठ्या संख्येने प्राथमिक शिक्षक शाळा बंद ठेवून जिल्ह्यात दाखल झाले असून शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यानी काढलेले आदेश तात्काळ रद्द करावेत, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर हे एकदिवशीय आंदोलन सुरु झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दंगल नियंत्रक पथक सुद्धा तैनाद करण्यात आले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनां सामील झाल्या असून शेकडोंच्या संख्येने शिक्षक सहभागी झाले आहेत. उपस्थित शिक्षक समुदाय समोर विविध शिक्षक संघटनां पदाधिकारी आंदोलना मागील भूमिका आपल्या भाषाणातून व्यक्त करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − two =