You are currently viewing विट्याला पाणी पुरवठा करण्यात अनेक अडचणी पण विभागाचे शर्थीचे प्रयत्न

विट्याला पाणी पुरवठा करण्यात अनेक अडचणी पण विभागाचे शर्थीचे प्रयत्न

विटे / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

विटे शहराला पाणी पुरवठा करत असताना पालिकेला अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. पाईप गळती, पाईप फुटणे, अनियमित विजपुरवठा यामुळे पाणी पुरवठा करण्यात सातत्य रहात नाही. असे असताना पालिका पाणीपुरवठा विभाग शर्थीचे प्रयत्न करून पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहे. निदान पाण्याच्या वेळा तरी पाळल्या जात आहेत.

याबाबत उपलब्ध झालेली माहिती अशी, आळसंद जलशुद्धीकरण केंद्र ते चक्रधारी यंत्रमाग संस्था दरम्यान सुमारे पाच किलोमीटर नवीन डी आय 450mm पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्याची जुन्या लाईनला क्रॉस कनेक्शन करण्याचे काम बारा ते सायंकाळी पावणे सहा या वेळेत प्रचंड पाऊस असताना देखील फिल्टर व चक्रधारी या दोन्ही ठिकाणचे जुन्या लाईनला जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. नवीन लाईनला जोडण्या करण्याचे काम दोन दिवसात पूर्ण होईल हे करताना पाणीपुरवठा खंडित करावा लागणार नाही याची दक्षता घेतली आहे. सदर काम माननीय मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार पूर्ण केले आहे. क्रॉस कनेक्शन चे औचित्य साधून घोगाव जॅकवेल येथील पंपसेट क्रमांक एक वरील 300 एचपी मोटर च्या बेरिंग मधून खूप मोठा आवाज येत होता त्यामुळे मोटर जळण्याचा धोका निर्माण झाला होता हे टाळण्यासाठी सदर मोटर तातडीने खोलून त्याची दोन्ही बेरिंग नवीन बसवण्याचे काम पूर्ण केले आहे.

काल चार वाजले पासून येणाऱ्या पाण्याचे प्रेशर ताशी पंधरा हजार लिटर ने कमी मिळत असल्याने लगेच लाईन तपासणी मोहीम हाती घेतली व तांदळगाव हद्दीत येरळा नदीच्या पुलाजवळ लिकेज शोध मोहीम तातडीने सुरू केली आहे रात्री खूप उशीर झाल्याने अंधारात काम करता येत नव्हते त्यामुळे सदर लिकेज काढण्याचे काम दुपारपर्यंत पूर्ण करीत आहोत पॉईंट सापडलेला आहे. नगरसेवक संजय भिंगारदेवे स्वतः याबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा