You are currently viewing चितारआळी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, सावंतवाडी येथे  ‘लोकसंवाद-२०२६’ कार्यक्रमाचे आयोजन

चितारआळी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, सावंतवाडी येथे  ‘लोकसंवाद-२०२६’ कार्यक्रमाचे आयोजन

चितारआळी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, सावंतवाडी येथे  ‘लोकसंवाद-२०२६’ कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्ग

सावंतवाडी येथील चितारआळी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या आवारात ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. विशेषतः महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली व योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

                लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळे ही केवळ सांस्कृतिक उपक्रमांची केंद्रे न राहता शासकीय माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहेत. यावेळी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, शासकीय सेवा आणि नागरिकांसाठी उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सार्वजनिक गणेश मंडळाने यावेळी वर्षभरात राबविण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. या मंडळामार्फत यावेळी टाकाऊ कागदापासून गणेश मूर्ती तयार करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे. अनेक प्रकारच्या सामाजिक उपक्रमांतून त्यांनी नागरिकांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.

                यावेळी मंडळातील उपाध्यक्ष राघवेंद्र चितारी, उदय चितारी, गौरव दळवी, शुभम वरदम, कलपित नारुळकर, राकेश दळवी उपस्थित होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे, अधीक्षक बी. जी. काटकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या उत्सवाचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यासाठी ‘Bappa.org’ पोर्टलबाबतही यावेळी माहिती देण्यात आली.

000000

युवकांनी ‘विकसित भारत क्विझ’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन सहभागाची संधी

आत्तापर्यंत जिल्ह्यात ५ हजार ४० युवकांची नोंदणी

                सिंधुदुर्ग, दि. २४ (जिमाका) : विकसित भारताच्या उभारणीत युवकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून ‘विकसित भारत क्विझ’चे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या ज्ञानाची चाचणी घेण्याबरोबरच विकसित भारताच्या संकल्पनेशी जोडले जावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, जिल्हा युवा अधिकारी सम्राट पाटील, शिक्षाधिकारी प्राथमिक सुबोध माने, शिक्षणाधिकारी माध्यमिक व्ही एस पाटील, जिल्हा संघटक स्काउट एंड गाइड अंजली माहूरे, जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना मिलिंद कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई उपस्थित होते.

                ‘विकसित भारत क्विझ’ हा

प्रतिक्रिया व्यक्त करा