You are currently viewing पाणी पिताना मगरीचा म्हैशीवर हल्ला…

पाणी पिताना मगरीचा म्हैशीवर हल्ला…

सांगेली खळणेवाडी येथील घटना

सावंतवाडी
बंधाऱ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या म्हैशीवर मगरीने हल्ला केल्याची घटना सांगेली खळणेवाडी येथे घडली. गुराख्याच्या समोरच ही घटना घडल्याने गुराखी आरडाओरड करीत पुढे धावून गेल्याने मगरीने म्हशीचा पाय सोडला. मात्र, या हल्ल्यात मगरीचे दात खोलवर रुतल्याने मोठी जखम झाली आहे.

सांगेली येथील जयानंद पांडुरंग सावंत यांच्या म्हैशी घेऊन सिताराम सोनू नाटलेकर हा त्यांच्याच शेतात चरायला गेला होता. तिथून म्हैशींना घेऊन घरी परतत असताना शेतातील पाणलोटच्या तळीतील पाणी देण्यासाठी गेला. दरम्यान, पाणी पित असतानाच मगरीने हा हल्ला केला. तळीतील मगरीने म्हैशीच्या मागच्या डाव्या पायाला लक्ष केल्याने या हल्ल्यात पायावर मगरीचे खोलवर दात लागले. त्यामुळे या पायाला मोठी दुखापत झाली. दरम्यान याबाबत वनपाल ढेकळे यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − nine =