पुणे फेस्टिव्हल डर्ट ट्रॅक रेसमध्ये सारंगी करंजावणेची सलग दुसरी पोडियम कामगिरी
राज्यस्तरीय एक्स्ट्रीम डर्ट ट्रॅक रेसमध्ये दमदार यश; रोडीज ग्रुपचे अमरेंद्र साठे यांच्या हस्ते बक्षीस वितरण
पुणे :
एक्स्ट्रीम मोटर स्पोर्ट्सच्या सौ. शीतल राठोड यांच्या आयोजनाखाली पुण्यातील गोळीबार मैदान येथे १९ व २० सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय ‘पुणे फेस्टिव्हल–एक्स्ट्रीम डर्ट ट्रॅक रेस २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र व गोवा राज्यातील अनेक रायडर्सनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या स्पर्धेत कु. सारंगी करंजावणे (Speedyeagle_23) हिने दमदार कामगिरी करत सलग दुसऱ्यांदा पोडियम पदक पटकावले. तिच्या या यशाबद्दल बक्षीस वितरण समारंभात रोडीज ग्रुपचे अमरेंद्र साठे यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला.
सारंगीच्या या यशामागे तिचे आई-वडील सामाजिक कार्यकर्ते सचिन करंजावणे व सौ. संजना करंजावणे यांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि पाठबळ महत्त्वाचे ठरले. सौ. संजना करंजावणे या मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या पिंपरी-चिंचवड महिला शहराध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. सारंगीचे वडील सचिन करंजावणे हे देखील राज्यस्तरीय रायडर असल्याने तिला घरातूनच मोटरस्पोर्ट्सची प्रेरणा मिळाली.
सारंगीच्या यशात रोडीज ग्रुप, एसटीएस ग्रुप आणि कुमॅन्को ग्रुपचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. “या ग्रुपच्या मार्गदर्शनामुळेच मला यश मिळाले,” असे सारंगी करंजावणे हिने सांगितले.
महिलांना मोटरस्पोर्ट्समध्ये प्रोत्साहन देऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सौ. शीतल राठोड यांनी केलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सारंगीच्या सलग दुसऱ्या पोडियम यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
