टाटा वाहनांच्या संपूर्ण स्वदेशी अभियानाचा अनुभव घेण्याचे आवाहन
सावंतवाडी :
टाटा मोटर्सचे डीलर्स नेटवर्क एस. पी. ऑटोहब, कणकवली आणि ओरोस येथे ग्राहकांच्या प्रथम पसंतीस उतरल्यानंतर आता संपूर्ण स्वदेशी अभियान सावंतवाडीतील करोल प्लाझा, शिरोडा नाका येथे सर्व सुविधायुक्त वातानुकूलित शोरूमच्या माध्यमातून ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे. यानिमित्त २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता सत्यनारायण पूजा तसेच अल्पोपहार व चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
टाटा मोटर्सची सर्व वाहने ग्लोबल एनकॅप अंतर्गत ४ स्टार आणि ५ स्टार सेफ्टी रेटिंगयुक्त असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच ४ स्टार चाइल्ड सेफ्टी रेटिंग टाटा वाहनांमध्ये असल्याने संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही वाहने उपयुक्त असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. त्यामुळे ग्राहकांनी कार खरेदी करताना ग्लोबल एनकॅप रेटिंगविषयी नेटवर माहिती घेऊन निर्णय घेणे हितावह ठरणार असल्याचेही सांगण्यात आले.
ग्राहकांसाठी १५०० टक्के ऑनरोड फायनान्स, सर्वात कमी व्याजदर, सात वर्षांची कर्जमुदत तसेच खास शेतकरी बांधवांसाठी ७/१२ आणि ८-अ वर कर्ज सुविधा व सहामाही ईएमआय अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
एस. पी. ग्रुपने गोवा, गुजरात आणि राजस्थान येथे अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत प्रवेश केला आहे. टाटा कार श्रेणीअंतर्गत टियागो, टिगोर (पेट्रोल व सीएनजी), नेक्सॉन (पेट्रोल व डिझेल), पंच आणि अल्ट्रोज ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच हॅरियर आणि ७ सीटर सफारी या दोन्ही गाड्या पेट्रोल व डिझेल पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.
नुकतीच टाटा मोटर्सने सिएरा ही गाडी पेट्रोल व डिझेल या दोन्ही फ्युएल पर्यायांमध्ये लाँच केली असून, या कारच्या बुकिंगला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
ग्राहकांनी अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा आणि टाटा कारच्या संपूर्ण स्वदेशी अभियानाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन टाटा मोटर्सने पत्रकाद्वारे केले आहे.
