You are currently viewing जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन

– निवासी उपजिल्हाधिकारी आविषकुमार सोनोने

सिंधुदुर्गनगरी 

जिल्हास्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या क्षेत्रिय कार्यालयाच्या कामकाजाकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षसाठी निवासी उपजिल्हाधिकारी हे पदसिध्द विशेष अधिकारी असून नायब तहसिलदार व महसूल सहाय्यक, अव्वल कारकून यांची या कक्षाकरिता नियुक्ती करण्यात आलेली आहे.अशी माहिती विशेष कार्य अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी आविषकुमार सोनोने  यांनी दिली.

            राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे व त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदन इत्यादी कार्यवाहीमध्ये अधिक लोकाभिमुख, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रिय कार्यालय त्वरीत सुरु करण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत.त्यानुसार सदर कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

            तरी यापुढे सर्वसामान्य जनतेने मुख्यमंत्री महोदय यांना सादर करावयाचे आपले दैनदिन प्रश्न शासन स्तरावर असलेली कामे व त्यासंदर्भातील प्राप्त होणारे अर्ज, निवेदन मंत्रालय,मुंबई येथे सादर न करता मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सिंधुदुर्ग येथे सादर करावीत. असे आवाहन पदसिध्द विशेष कार्य अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी आविषकुमार सोनोने यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा