You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात छोट्या शिशुंना‌ मोफत किटस वाटप

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात छोट्या शिशुंना‌ मोफत किटस वाटप

सावंतवाडी :

 

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील छोट्या शिशुंना सह्याद्री फाउंडेशन मानसून महोत्सव निमित्त बेबीज वर्ड्स तर्फे मोफत किटस वाटप करण्यात आले. जवळपास ७० हून अधिक छोट्या शिशु व माता यांना संगोपनासाठी लागणाऱ्या वस्तू या किटमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या. यावेळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत, सह्याद्री फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, अध्यक्ष रवींद्र मडगावकर, कार्यवाहक ॲड. संतोष सावंत, सचिव प्रताप परब, सामाजिक कार्यकर्त्या रेखा कुमठेकर, प्रल्हाद तावडे, उपाध्यक्ष विभावरी सुकी, मोहिनी मडगावकर, सुहास सावंत, गजानन बांदेकर, प्रमोद सावंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, दीपक राऊळ, अभिषेक राऊळ आधी उपस्थित होते.

यावेळी श्री राऊळ म्हणाले सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात नुकत्याच जन्माला आलेल्या शिशु यांना त्यांच्या संगोपनासाठी लागणारे साहित्य चांगल्या दर्जाचे दिले तर निश्चितपणे त्यांची वाढ सुलभतेने होईल आणि मुले सुदृढ कशी बनतील? या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही त्यांना हे साहित्य किट वाटप केले आहे. बेबी ज वर्ड्स च्या सहकार्याने हे शक्य झाले आहे. माता बाल संगोपनाच्या दृष्टीने निश्चितपणे असे उपक्रम घेतले जातील. असे ते म्हणाले

प्रतिक्रिया व्यक्त करा