You are currently viewing राजन आंगणेच्या रुपाने जनतेशी बांधिलकी असलेला सच्चा कार्यकर्ता हरपला : केंद्रीय मंत्री नारायण राणे

राजन आंगणेच्या रुपाने जनतेशी बांधिलकी असलेला सच्चा कार्यकर्ता हरपला : केंद्रीय मंत्री नारायण राणे

राजन आंगणेच्या रुपाने जनतेशी बांधिलकी असलेला सच्चा कार्यकर्ता हरपला : नारायण राणे

हेल्पलाईन फाऊंडेशन व हेल्पलाईन मित्रमंडळातर्फे आयोजित शोकसभेत अनेकांचे डोळे पाणावले

सावंतवाडी

राजन आंगणे यांचं निधन झालं ही अतिशय दुःखद घटना आहे. त्यांच्या जाण्यानं एक चांगला उद्योजक गोरगरीबांसाठी धावून जाणारा, जनतेशी बांधिलकी असणारा माझा एक सच्चा कार्यकर्ता हरपला याचं फार दुःख आहे. त्यांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो व आंगणे कुटुंबियांना हे दुःख पचविण्याची ताकद रामेश्वर देवो, अशा भावना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त करत आदरांजली अर्पण केली.

सावंतवाडी येथे हेल्पलाईन फाऊंडेशन व हेल्पलाईन मित्रमंडळातर्फे आयोजित शोकसभेत ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहत मंत्री नारायण राणेंनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राजन आंगणेंच्या स्मृतींनी उपस्थितांचे डोळे पाणावले होते.सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठावरील श्रीराम वाचन मंदीर समोरील कट्यावर हेल्पलाईन फाउंडेशन व हेल्पलाईन मित्रमंडळ सावंतवाडीच्या माध्यमातून उद्योजक स्व.राजन आंगणे यांच्या श्रद्धांजली सभेच आयोजन करण्यात आलं होतं. या सभेच्या सुरूवातीला स्व. राजन आंगणे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राजन आंगणेंच्या स्मृतींना उजाळा देण्यात आल्यानंतर उपस्थितांना अश्रू अनावर झाले.

यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त करताना स्व.राजन आंगणेंप्रती आपल्या भावना व्यक्त करत आदरांजली अर्पण केली. तर रोज सायंकाळी ज्या कट्ट्यावर त्यांचा सहवास असायचा त्या कट्ट्याला स्व.राजन आंगणेंचं नाव देण्यात यावं अशी मागणी मान्यवरांनी केली.

या शोकसभेस माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, ज्येष्ठ नेते विकासभाई सावंत, सी.एल.नाईक, माजी नगरसेवक उदय नाईक, हेल्पलाईन उपाध्यक्ष शिवशंकर उर्फ बंड्या नेरूरकर, निवृत्त पोलिस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस, संतोष कदम, दीपक पाटकर, विजय चव्हाण, माजी नगरसेविका शुभांगी सुकी, माया चिटणीस, डॉ. राजेश गुप्ता, माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, पुंडलिक दळवी, ॲड. अनिल निरवडेकर, ॲड. संजू शिरोडकर, ॲड. नकुल पार्सेकर, दीपक पटेकर, समीर वंजारी, अतुल पेंढारकर, महेश कुमठेकर, रेखा कुमठेकर, तुषार वेंगुर्लेकर, बाळा बोर्डेकर, निशांत तोरसकर, रविंद्र मडगावकर, उद्योजक दीपक परब, महेश सुकी, केतन आजगावकर, वल्लभ नेवगी, रामदास पारकर, सुधीर धुमे, सुधीर पराडकर, दत्ता सावंत, राजेश पनवेलकर, जितेंद्र पंडीत, संतोष गांवस, अरूण भिसे, निशांत तोरसकर, चेतन नेवगी , ज्योती तोरसकर, गुरू मठकर, राजन म्हापसेकर, रितेश हावळ, साई हवालदार, सतीश बागवे, अजय गोंदावळे, बाळ चोणकर, भाई देऊलकर, नासिर शेख, संतोष गांवस, मकरंद कशाळीकर, दिपक म्हापसेकर, बाबली गवंडे, ॲड. डी.डी.देसाई, सत्यवान बांदेकर, परशुराम गावडे, रिक्षा युनियनचे सचिव सुधीर पराडकर, दिनेश चव्हाण, दादा नगनूर, रविकिरण तोरसकर, अरुण भिसे, श्रीकांत म्हापसेकर, महेश सुकी, दीनानाथ नाईक, राजा सामंत, आदिंसह मोठ्या संख्येने राजनभाई आंगणे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 5 =