You are currently viewing निरवडे-कोणापाल येथे दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक

निरवडे-कोणापाल येथे दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक

निरवडे-कोणापाल येथे दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक

तुळस व तळवडे येथील दोघे जखमी; सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार

सावंतवाडी :

निरवडे-कोणापाल येथे दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही चालक गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडला.
सुनील महादेव परब (वय ५०, रा. तुळस, ता. वेंगुर्ले) आणि पांडुरंग नामदेव वायंगणकर (वय ५०, रा. तळवडे, ता. सावंतवाडी) हे दोघे या अपघातात जखमी झाले. अपघातानंतर नातेवाईक व मित्रपरिवाराने त्यांना तातडीने निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर ओंकार कोल्हे, डॉक्टर प्रभाकर शिगारे तसेच परिचारिका स्नेहल आंगवडे यांनी दोन्ही जखमींवर प्राथमिक उपचार केले. त्यांना औषधोपचार व इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी दोन्ही रुग्णांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दोन्ही जखमींचे सीटी स्कॅन करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत. या वेळी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनीही सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा