You are currently viewing रस्त्याची साईड पट्टी सदोष असल्याने सायकलस्वार गंभीर

रस्त्याची साईड पट्टी सदोष असल्याने सायकलस्वार गंभीर

सावंतवाडी
आज सकाळी साडेसहा वाजता मळगाव घाटीत डि के टुरिझम जवळ रस्त्याची साईड पट्टी सदोष असल्यामुळे एका सायकल स्वाराला गंभीर अपघात झाला. सावंतवाडी येथील एलआयसी ऑफिसर श्री दिलीप म्हापसेकर हे नेहमीप्रमाणे आपल्या सायकल वरून सकाळची रपेट मारत असताना रस्त्याच्या बाजूला मुख्य रस्ता व साईड पट्टी यात जास्त अंतर असल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांपासुन संरक्षण करण्यासाठी बाजूला घेतली सायकल खड्ड्यात गेली व सायकल चे दोन तुकडे होऊन श्री म्हापसेकर हे रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर बेशुद्ध पडले. हेल्मेट असूनही त्यांचे डोक्याला मार लागुन ते रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळले.


सावंतवाडीचे संदीप कुडतरकर यांच्या डोळ्यादेखत हा अपघात घडला आणि त्यानी व त्यांचे ग्रुपने धावपळ करून अपघातग्रसताला रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांच्या ग्रुपमधील विजय बिरोडकर, शिरीष राऊत, मारुती सावंत, नितीन कुडतरकर, प्रवीण कुडतरकर, डी के सावंत यांनी सर्वतोपरी सहकार्य केले.त्यामुळे अपघातग्रस्त रुग्णाचे जीव वाचण्यास मदत झाली. त्या ठिकाणी संदीप कुडतरकर हे सर्वप्रथम एकटेच होते मदतीसाठी येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगत होते परंतु कोणीही सहकार्य करायला तयार नव्हते. शेवटी त्यांनी हाक दिल्याने त्यांच्या मागोमाग त्यांच्याच ग्रुपमधील सर्व धावून आले व योग्य ती मदत करून रुग्णाला रुग्णालयात दाखल केले.


याघाटीत असे वारंवार अपघात होतात. परंतु संबंधित वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे नेहमीच दुर्लक्ष करते याबद्दल सर्वांनी नापसंती व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा