You are currently viewing कुणकेश्वर समुद्रकिनारी शनिवारी विशेष स्वच्छता मोहीम

कुणकेश्वर समुद्रकिनारी शनिवारी विशेष स्वच्छता मोहीम

कुणकेश्वर समुद्रकिनारी शनिवारी विशेष स्वच्छता मोहीम

‘राष्ट्रीय किनारा अभियान’ अंतर्गत १९ सप्टेंबरला उपक्रम; ग्रामस्थ, युवक, व्यापारी व पर्यटकांना सहभागी होण्याचे आवाहन

कुणकेश्वर :

‘राष्ट्रीय किनारा अभियान’ अंतर्गत शनिवारी, १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत कुणकेश्वर समुद्रकिनारी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून नागरिक, व्यावसायिक, पर्यटक तसेच विविध सामाजिक संस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या मोहिमेस जिल्हास्तरावरील विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. समुद्रकिनारा स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या मोहिमेत सर्वांनी सहभागी होणे आवश्यक असल्याचे ग्रामपंचायतीने म्हटले आहे.
क्षेत्रातील ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक मंडळे, व्यापारी आणि लोकप्रतिनिधींनी वेळेवर उपस्थित राहून स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा