You are currently viewing संगीत रत्न,भजन सम्राट भालचंद्र केळुसकर यांचा ३ मे रोजी भव्य जाहीर सत्कार

संगीत रत्न,भजन सम्राट भालचंद्र केळुसकर यांचा ३ मे रोजी भव्य जाहीर सत्कार

संगीत रत्न कोकण भजन सम्राट भालचंद्र केळुसकर यांचा ३ मे रोजी भव्य जाहीर सत्कार

मालवण

सिंधुरत्र, संगीत रत्न पुरस्कार प्राप्त, कोकण भजन सम्राट, लोकप्रिय बुवा भालचंद्र केळुसकर यांचा भव्य जाहीर सत्कार सोहळा ३मे रोजी वायरी भूतनाथ येथील भूतनाथ रंगमंच येथे आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त ३ व ४ मे रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भारत नाट्य मंडळ वायरी भूतनाथ, भूतनाथ प्रासादिक भजन नाट्य मंडळ, श्री भूतनाथ युवा प्रतिष्ठान, वाईरकर रापण संघाचे वायरी भूतनाथ, श्री भूतनाथ नूतन नाट्यसमाज, श्री नाट्य मिनार कलानिकेतन जाधव वाडी वायरी, श्री भूतनाथ नवतरुण मंडळ आणि वायरी भूतनाथ ग्रामस्थ यांच्यावतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आता आहे. वायरी गावातील ज्येष्ठ कलावंतांनी भजन आणि नाट्यकला संस्कृती आजही जपून ठेवली आहे. अशा कलावंतांचा वायरी भूतनाथ ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्याचे निश्चित केले आहे.

३ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता भजनी बुवा भालचंद्र केळुस्कर आणि वायरी गावातील ज्येष्ठ भजन नाट्य कलावंतांचा सत्कार सोहळा होणार आहे. या सोहळ्यास खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी रात्री ९ वाजता रेकॉर्ड डान्स होणार आहेत. ४ मे रोजी रात्री ९ वाजता श्री भूतनाथ प्रासादिक भजन नाटा मंडळ यांच्यावतीने ट्रिकसीनयुक्त संगीतमय पौराणिक नाटक ‘संत गोरा कुंभार याचे सादरीकरण होणार आहे. या सोहळ्यास जिल्ह्यातीत भजन प्रेमी, नाट्यप्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वायरी भूतनाथ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 1 =