You are currently viewing अवैध शस्त्र बाळगणे व विक्री प्रकरणी दोघांना नियमित जामीन मंजूर

अवैध शस्त्र बाळगणे व विक्री प्रकरणी दोघांना नियमित जामीन मंजूर

अवैध शस्त्र बाळगणे व विक्री प्रकरणी दोघांना नियमित जामीन मंजूर

जिल्हा न्यायालयाचा निर्णय; अॅड. अशपाक शेख यांचा युक्तिवाद ग्राह्य, प्रत्येकी ५० हजारांच्या जातमुचलक्यावर मुक्ततेचे आदेश

सावंतवाडी :

अवैध गावठी बंदुका तयार करणे, त्यांची खरेदी-विक्री व बाळगल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक २१५/२०२६ मधील आरोपी मंजुनाथ सुभाष कईटकर आणि जन्नु जिम्मु बिचकुले यांना नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दाणोली गावठाणवाडी येथे २५ ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या या प्रकरणात शस्त्र अधिनियम १९५९ मधील विविध कलमांसह भारतीय न्याय संहितेच्या कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान मंजुनाथ कईटकर याच्याकडून एक गावठी बंदूक व दोन काडतुसे, तर जन्नु बिचकुले याच्याकडून एक गावठी बंदूक जप्त करण्यात आली होती.
यापूर्वी त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र, याच गुन्ह्यातील अन्य आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून जामीन मंजूर झाल्यानंतर दोघांनी पुन्हा जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

या अर्जावर झालेल्या सुनावणीत आरोपींचे वकील अॅड. अशपाक शेख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून ओरोस येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस. टी. त्रिपाठी यांनी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जामीन रकमेवर तसेच काही अटी व शर्तींवर दोन्ही आरोपींची मुक्तता करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणात अॅड. अशपाक शेख यांनी आरोपींच्या वतीने काम पाहिले. त्यांना अॅड. नामदेव फ. मठकर, अॅड. विनय रजपूत, अॅड. कैस शेख, अॅड. भूषण कदम, अॅड. हरेश म. वरावडेकर आणि अॅड. आसिम नि. मुजावर यांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा