You are currently viewing दोडामार्गात आज राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा

दोडामार्गात आज राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा

*कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना परब यांचीही असणार प्रमुख उपस्थिती*

*दोडामार्ग

तालुक्यात आज २६ ओक्टॉबर रोजी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आवाज घुमणार असून कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत महालक्ष्मी हॉल दोडामार्ग येथे सकाळी दहा वाजता कार्यकर्ता मेळावा होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी कार्याध्यक्ष संसदरत्न सौ. सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र राज्यात झंझावाती दौरा सुरू केला आहे, त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यकर्ता मेळावा संपन्न होत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग महिला प्रमुख अर्चना घारे परब यांनी गेल्या काही वर्षात या मतदार संघात आपले स्थान निर्माण करताना लोकपयोगी अनेक कामे केली आहेत, त्यांनाही सुप्रिया सुळे यांच्या या दौऱ्याने अधिक बळ मिळेल हे निश्चित, दोडामार्ग तालुक्यात सुरेश दळवी यांच्या नेतृत्वाखाली तसेच तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर आणि उपजिल्हाध्यक्ष संदीप गवस यांच्या माध्यमातून व जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस स्वप्नवत वाटचाल करत आहे, त्याला सौ.अर्चना घारे परब ह्या साथ देत असल्याने सावंतवाडी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट होत असून येथीलत पुढील आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल हेही निश्चित असल्याचे बोलले जात आहे, एकूणच सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्याने दोडामार्ग मधील व एकूण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांत नवचैतन्य आहे.

*संवाद मीडिया*

*☘️विजयादशमी म्हणजे विजयोत्सव.☘️*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙ही विजयादशमी साजरी करा पर्यावरण पूरक कार खरेदी करूनच…🚙*

💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113471/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा