You are currently viewing आम्ही सुद्धा लेखिका

आम्ही सुद्धा लेखिका

*लेखिका कवयित्री कांचनगंगा मोरे यांच्या “क्षितिजापार” या पहिल्या काव्यसंग्रहाचे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रकाशन*

*”आम्ही सुद्धा लेखिका” साहित्य संस्था आयोजित साहित्य संमेलनात झाले प्रकाशन*

माझा मऱ्हाटाची बोलू कवतिके
अमृतातेही पैजा जिंके ll
संपूर्ण विश्वात जिला तोड नाही अशा समृद्ध मराठी भाषेचा आनंदोत्सव म्हणजे साहित्य संमेलन. आणि हे संमेलन जर महिलांनी महिलांसाठी आयोजलेले असेल तर त्याच्याविषयीं एक वेगळी आत्मीयता, जिव्हाळा मनाला स्पर्शून जातो …!
दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी आम्ही सिद्ध लेखीका या साहित्यिक संस्थेने ठाणे येथे राज्यस्तरीय पहिले महिला साहित्य संमेलन आयोजित केले होते.
सुप्रसिद्ध कादंबरीकार शुभांगीताई भडभडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या संमेलनात सन्माननीय कवयित्री जोत्स्ना चांदगुडे, वीणा गवाणकर, मंगला गोडबोले,भारतीताई मेहता, माधवी घारपुरे, पद्माताई हुशिंग विजया पंडितराव, कमलताई नलावडे, स्नेहलता झरकर, मीनाताई महामुनी यांच्यासह अनेक मान्यवर कवयित्री आणि लेखिका उपस्थित होत्या. मला सांगायला आनंद होतोय की या सर्वांच्या उपस्थितीत, अक्षय त्तृतियेच्या सुवर्णं मुहूर्तावर माझ्या क्षितिजापार या पहिल्याच काव्यसंग्रहाचे प्रकाशनही तिथे झाले…!
समग्र प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या काव्यसंग्रहाला सुप्रसिद्ध कवी प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर सर यांची प्रस्तावना लाभली आहे.
सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या क्षणांना पापणडोही फुटणारे धुमारे …. आणि त्यातूनच निर्माण होणारी जगण्याची असोशी… या आणि अशाच मानवी भाव भावनांचा शब्दातून ठाव घेणारी कविता प्रस्तुत कविता संग्रहातून आपणास अनुभवता येईल.
मी स्वतः दिव्यांग असल्यामूळे अनंत अडथळे व शारीरिक मर्यादांना ओलांडून, टीम आम्ही सिद्ध लेखीका धाराशिवच्या सहकार्याने या संमेलनास निमंत्रित कवयित्री म्हणून उपस्थित राहून माझ्या क्षितिजापार या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा मी अनुभवला. याचे समाधान आहेच. पण तिथे पार पडलेला कौतुक सोहळा माझ्यासाठी ह्रदयस्पर्शी आणि अविस्मरणीय ठरला.
चाकोरीतील वहीवाटेवर चालताना आयुष्याच्या गणितातून काही अवयव वजा करूनही वास्तवाचे भान ठेवून उपेक्षितांच्या सुखासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या दिव्यांग व्यक्तींची प्रेरणा व आदर्श घेऊन या पुस्तक विक्रीतून मिळणारी सर्व रक्कम दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी खर्च करायचा माझा संकल्प आहे.

✍️कांचनगंगा मुरलीधर मोरे
काक्रंबा ता. तुळजापूर
मो. नं.- 7620363500

 

संवाद मीडिया*

*🎊सुवर्णसंधी..!!🎊सुवर्णसंधी..!!🎊 सुवर्णसंधी..!!🎊*

*🪙अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर🥳 हक्काचे घर खरेदी🏡 करणार्‍या ग्राहकांना👥सुवर्णसंधी…!!🎊*

*🛣️कुडाळ येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी पार्क🌆 मध्ये फ्लॅट🏢 बूक करा🏷️आणि मिळवा 🤗तब्बल 2️⃣ लाखाच्या वस्तू🛍️*

*_🛣️कुडाळ शहराच्या🌆 मध्यभागी सर्व सुविधांनी 🤗युक्त फ्लॅट 🏢घेण्याचे स्वप्न पुर्ण करा..!!🤩_*

*🔸३२ इंची एलईडी टीव्ही🖥️*
*🔹विंडो एसी सी वन टन🥶*
*🔸सिंगल डोर फ्रीज🚪*
*🔹टीव्ही युनिट📺*
*🔸फाईव्ह सीटर सोपासेट🛋️*
*🔹थ्री डोर कपबोर्ड👚*
*🔸क्वीन साईज बेड🛏️*
*🔹क्वीन साइज मॅट्रेस विथ पिलो🧽*
*🔸 सेंटर टेबल🪑*
*🔹शु रॅक👟*
*🔸फोटो फ्रेम 5 qty🖼️*

*_👉…आणि बरंच काही…!!🥳_*

*🛑विशेष टिप:- हि ऑफर फक्त अक्षयतृतीये दिवशीच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे..!!_*

*🎴आमचा पत्ता-:*
*छत्रपती शिवाजी पार्क*
*_सत्कार हॉटेल रोड, जुना बसस्टॉप समोर, कुडाळ_*

*📲संपर्क:-*
*७०३८२८१२३४ / ९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१ / ९४०४७५१५००*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 6 =