You are currently viewing शिवसेना चित्रपट सेनेला खिंडार

शिवसेना चित्रपट सेनेला खिंडार

*चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष दिगंबर नाईक भाजपच्या वाटेवर?*

 

शिवसेनेला एक मागून एक धक्के बसत आहेत, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ३९ आमदार, चित्रपट सेनेतील बंडाळी आता रा स्व संघाच्या तालमीत तयार झालेले. पण गेली १० वर्षे शिवसेनेचा स्टार प्रचारक, मालवणी सम्राट, ललित नाट्य ट्रस्टचे विश्वस्त असलेले ज्यांनी ग्रामीण भागात एकटे एकटे फिरून शिवसेनेचा प्रचार केला ते नाट्य, सिनेमा अभिनेते, चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष दिगंबर नाईक सुद्धा नाराज असल्याने भाजपा च्या वाटेवर असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

शिवसेनेत बंड काही नवे नसले तरी सध्या शिवसेना पक्षावरच दावा कोणाचा ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. ३९ आमदार नंतर काही खासदार सुद्धा भाजपा सोबत युती व्हावी यासाठी पक्षप्रमुखकडे आग्रह करत आहेत. कारण भविष्यात निवडणुका लढवताना युती आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर चित्रपट अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांच्या आजारपणात केलेल्या मदतीबद्दल शिंदे यांच्याबद्दल पोस्ट केली होती. यामुळे शरद पोंक्षे यांच्या बद्दल चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी केलेलं विधान चर्चेत असताना लगेच चित्रपट सेनेतील वरळी विभागात राहणारे अमोल परब यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून बांदेकर यांच्या विरोधात बंड पुकारून राजीनामा दिला आहे.

ही बातमी ताजी असताना मालवणी सम्राट, चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष दिगंबर नाईक सुद्धा नाराज असल्याचे समजत आहे. दिगंबर नाईक हे नेहमीच सोशल मीडिया सक्रिय असलेले, नेहमीच कोकणातील दशावतार कलाकार जगला पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून मागे त्यांनी राज्यपाल महोदय यांची सुद्धा भेट घेतली होती. नेहमी कलाकार यांच्या बद्दल आस्था असलेल्या त्यांना चित्रपट सेनेतून न्याय मिळत नसल्याची खंत मागे व्यक्त केली होती. शिवसेनपक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा बांदेकर यांच्या सुचनाकडे बघत असतात. पण आमच्याकडे बघायला त्यांना वेळ नसल्याने ते सध्या भाजपच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 4 =