कोरोना प्रतिबंधक लस टोचुन घेण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड; पोलिसांच दुर्लक्ष

कोरोना प्रतिबंधक लस टोचुन घेण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड; पोलिसांच दुर्लक्ष

 

कणकवली तालुक्यातील कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना कोरोना संबंधित नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे वारंवार आवाहन केले जात असताना देखील आज सोमवारी सकाळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस टोचुन घेण्यासाठी व नोंदणी करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली.

कणकवली तालुक्यामध्ये आज दिनांक २६ एप्रिल सोमवार रोजी ५०० लसीचा डोस उपलब्ध झाला आहे. तर दोन दिवसांपूर्वी कोरोना लस संपल्या होत्या. फक्त जिल्ह्यात 10 हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी केली. लस घेण्यासाठी नागरिकांची झालेली गर्दी पाहून प्रशासनासमोर मोठा प्रश्न उभा राहिला.

कणकवली उपजिल्हा रुग्णालय आणि नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पासून ४५ वर्षावरील नागरिकांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी ही लसीकरणासाठी लांबलचक रांग लावली होती. परिणाम: गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभाग हतबल झाल्याचे चित्र दिसून पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचं चित्र लसीकरण केंद्रावर दिसत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा