You are currently viewing आनंद ज्येष्ठ नागरिक संघ पोस्टल कॉलनी वाकड ची एक दिवसीय सहल उत्साहात संपन्न 

आनंद ज्येष्ठ नागरिक संघ पोस्टल कॉलनी वाकड ची एक दिवसीय सहल उत्साहात संपन्न 

वाकड, चिंचवड – दिनांक ३ सप्टेंबर रोजी मौज, मजा, मस्ती, आणि निसर्गाच्या सानिध्यात पूर्ण एक दिवसची सहल काढण्यात आली.

पुण्यापासून जवळच भूगाव पौड रोड या ठिकाणी “निसर्ग छाया फाउंडेशन” ही भव्य दिव्य वास्तू आहे, जणू निसर्गाच्या कोंदणात बसलेली आहे असे वाटावे.

महाराष्ट्र राज्याचे नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून निसर्ग छाया फाउंडेशनची निर्मिती झालेली आहे. या फाउंडेशनचे व्यवस्थापक म्हणून श्री मंदार देगावकर व सौभाग्यवती अमृता देगावकर हे काम पाहत आहेत.

पुरुष १९ व महिला २५ असे 44 ज्येष्ठ नागरिक या सहलीत सहभागी होते.

वास्तुत प्रवेश केल्यानंतर सर्वांचे समाधान झाले व प्रवासाचा थकवा निघून गेला.

नाष्टा चहा व जेवणाची उत्तम सोय करण्यात आली होती.

दिवसभर विविध प्रकारचे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले ,

त्यापैकी संगीत खुर्ची, डान्स , गाणी ,रिंग, फुगे ,डंबेल इत्यादी प्रकारचे खेळ घेण्यात आले. सर्वजण यामध्ये रंगून गेले होते . असे वाटत होते की, प्रत्येक जण स्वतःचे एक वेगळे आयुष्य जगत आहे . आणि सर्वजन भरपूर आनंद घेत होते.लहान पणाच्या आयुष्याची पुनरावृत्ती होत आहे की काय असे वाटत होते.

दिवसभर धमाल, मज्जा, आनंद घेऊन संध्याकाळी सर्वजण समाधानाने परतीच्या प्रवासाला लागले.

या सहलीचे संयोजक -भागवत कोल्हे (अध्यक्ष ), मुरलीधर लहाने (उपाध्यक्ष ), सुरेश बोरकर (सचिव ), माधव बरहाटे (खजिनदार ) यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

वरीष्ठ पत्रकार बाबू डिसोजा यांनी वृत्त आढावा घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा