You are currently viewing मुख्याध्यापक मुकेश पवार सर यांना ‘वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान पुरस्कार’ जाहीर

मुख्याध्यापक मुकेश पवार सर यांना ‘वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान पुरस्कार’ जाहीर

मुख्याध्यापक मुकेश पवार सर यांना ‘वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान पुरस्कार’ जाहीर

कणकवली (प्रतिनिधी)

शिक्षक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रदान करण्यात येणारा ‘वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान पुरस्कार’ यावर्षीही जाहीर करण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधून प्राथमिक व माध्यमिक शाळेतील प्रत्येकी एका शिक्षकाची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

यावर्षी कणकवली तालुक्यातून शिवडाव हायस्कूलचे विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक तथा इंग्रजी विषयाचे अध्यापक सन्माननीय श्री. मुकेश पवार सर यांची ‘गुरुसेवा सन्मान पुरस्कारासाठी’ निवड करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणारे, शांत, संयमी व हसतमुख व्यक्तिमत्त्व म्हणून मुकेश पवार सर यांची विशेष ओळख आहे. सर्वांशी सहकार्याची भावना ठेवून काम करणारे आणि आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा जपणारे शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

आज, ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली, ही त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करणारी आणि समस्त शिक्षकवर्गासाठी अभिमानाची बाब आहे.

या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ग्रंथभेट असे आहे. माजी शालेय शिक्षणमंत्री मा. श्री. दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते लवकरच या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.मुकेश पवार सरांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा