You are currently viewing संत गाडगेबाबा शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी शंभर कोटी निधी उपलब्ध करा

संत गाडगेबाबा शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी शंभर कोटी निधी उपलब्ध करा

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

सावंतवाडी

सावंतवाडी शहरातील भाजी मंडईच्या जागी होणाऱ्या संत गाडगेबाबा शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी उपलब्ध करण्यात आलेला निधी अपुरा असून सुसज्ज शॉपिंग कॉम्पेक्ससाठी शंभर कोटींची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासहित व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

सावंतवाडी शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले. स्थानिक व्यापाऱ्यांना विश्वास घेण्यासाठी आपण बैठक घ्यावी व त्यांचे योग्य जागी पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, व्यापारी महेश नार्वेकर, सचिन माडये आदी उपस्थित होते.
दरम्यान, आंबोली येथील पर्यटन विकास महामंडळाने बांधलेल्या रिसॉर्टची सखोल चौकशी करण्यात यावी. तर शिरशिंगे धरण हे गेली २५ वर्ष प्रलंबित असून धरणाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी. तसेच सदर धरणासाठी संपादित होत असलेल्या जमिनीचा भाग महाराष्ट्र शासनाने इतर ठिकाणी देऊन सदर धरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा