You are currently viewing आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित!

आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित!

क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या सेवेबद्दल मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि.) मुंबई ह्या प्रतिथयश संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार २०२०, वेंगुर्ला दाभोली येथील आंतरराष्ट्रीय शूटिंग बॉल पंच अशोक दाभोलकर याना प्रदान करण्यात आला आहे.

सिंधुदुर्गाचे लाडके व्यक्तीमत्व व आजही क्रीडा संस्कृती तळागाळात रुजावी म्हणून आपली लेखणी, कार्याने सिंधुदुर्गाचे नांव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे क्रीडा महर्षी श्री. अशोक गणेश दाभोलकर-मेस्री यांचा सदर पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

गेल्या अर्धशतकात एक सर्वसामान्य खेळाडू ते आंतरराष्ट्रीय पंच हा देशभर अवघड प्रवास करताना आपला अनुभव व क्रीडा विषय व नियमांचे बारकावे आज फेसबुक माध्यमाव्दारे आपल्या लिखाणातून ते क्रीडा प्रेमींना उपलब्ध करून देत आहेत. अशोक दाभोलकरांच्या निवडी बद्दल वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप, माजी जी प अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप, उद्योजक डॉ दीपक परब, मुंबई शूटिंग बॉल असो. सचिव दीपक सावंत, राजेंद्र सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा शुटिंगबॉल अध्यक्ष संजय कदम, भाजप मालवण महिला अध्यक्ष सौ लक्ष्मी पेडणेकर,पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा