You are currently viewing काँग्रेसकडून १३६ वा वर्धापनदिन साजरा…

काँग्रेसकडून १३६ वा वर्धापनदिन साजरा…

देवगड

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ला १३६ वर्ष पूर्ण होऊन १३७ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करावा .त्या अनुषंगाने देवगड तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने देवगड तालुका अध्यक्ष कार्यालयासमोर राष्ट्रीय काँग्रेस चा हात निशाणीचा तिरंगा फडकवून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जयजयकार करण्यात आला.

या प्रसंगी तालुका अध्यक्ष उल्हास मणचेकर,सेक्रेटरी सजाउद्दीन सोलकर,जिल्हा कार्यकारणी सदस्य ,सुरेश देवगडकर शहर अध्यक्ष उमेश कुळकर्णी, मनोज पारकर,तुषार भाबल,धनंजय सारंग संजय कदम सतीश पुरळकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा