You are currently viewing देवगड ग्रामीण रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू

देवगड ग्रामीण रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू

देवगड ग्रामीण रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू

राज्यकर्ते – प्रशासनाला कशासच सोयरसुतक नाही..?
युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी विचारला डॉक्टरांना जाब

देवगड :

देवगड ग्रामीण रुग्णालयात येथे नाडन येथील दोन दिवसाच्या नवजात बालकाचा मृत्यू झाला. तसेच त्याआधी दोनच दिवसांपूर्वी येथे महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता.देवगड ग्रामीण रुग्णालयात या घडलेल्या दोन घटनांचा जाब विचारण्यासाठी उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अध्यक्ष डॉ संजय विटकर यांना याबाबतचा जाब विचारन्याय आला.चांगली यंत्रणा नसल्यामुळे निष्पाप लोकांचे जीव जात आहेत.गेली पंधरा वर्षे सत्ताधारी लोकप्रतिनिधी रुग्णालयाला चांगली यंत्रणा देऊ शकले नाहीत. त्यामुळे यापुढेही यंत्रणा सुधारली नाही व अशाच घटना घडत राहिल्या तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आक्रमक होत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी यावेळी दिला.

काही दिवसांपूर्वी इळये येथील महिलेचा प्रसूती दरम्यान अति रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला होता. तसेच नवजात बालकाच्या दोन दिवसात शुगर कमी झाल्यामुळे मृत्यू झाला. या घटनेबाबत उबाठा शिवसेनेचे वतीने देवगड ग्रामीण रुग्णाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय विटकर यांना धारेवर धरून जाब विचारण्यात आला यावेळी डॉ. विटकर यांनी सदर महिलेला आवश्यक असलेल्या रक्तगटाचे रक्त रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. तसेच नवजात बालकांची ही शुगर कमी झाली होती त्यालाही उपचारासाठी पुढे पाठविण्यात आले होते. मात्र त्याच्या मृत्यू झाला अशी माहिती शिवसेना पदाधिकाऱ्याना देण्यात आली.रुग्णांच्या उपचारांमध्ये कोणताही हलगर्जीपणा करत नसून सध्या रुग्णालयात ४ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. ती भरणे आवश्यक आहे. तसेच

कार्डिॲक ॲम्बुलन्सची नितांत गरज असल्याचे डॉ विटकर यांनी सांगितले. यावेळी सुशांत नाईक यांनी रुग्णालयासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करू व लागेल ते सहकार्य करू परंतु रुग्णांना चांगली सेवा द्यावी असे सांगितले.

येथील आमदार हे भाजपचेच असून सत्तेत असूनही चांगली यंत्रणा रुग्णालयात उपलब्ध करू शकले नाही. त्यामुळे दोन दिवसापर्वी नवजात मुलाच्या आईचा तर आता दोन दिवसीय नवजात बालकांचा मृत्यू झाला. याला जबाबदार चांगली यंत्रणां न देऊ शकणारे सत्ताधारी लोकप्रतिनिधीच आहेत. असा आरोप करीत यापुढे चांगली यंत्रणा आवश्यक सोयी सुविधा रुग्णालयात दिल्या नाहीत. तर अशा घटनांची पुनरावृत्ती झाल्यास शिवसेना गप्प बसणार नाही तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी यावेळी दिला. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विष्णू घाडी, नगरसेवक बुवा ता, गणेश वाळके, विकास कोयंडे, प्रथमेश तावडे, योगेश गोळम, उदय करंगुटकर आदी उपस्थित होते.

देवगड ग्रामीण रुग्णालयाला कागदोपत्री उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जा दिला. खरा पण हे ग्रामीण रुग्णालय अपुऱ्या सुविधांन अभावी नेहमीच चर्चेत राहिले आहे. देवगड ग्रामीण रुग्णालयात दोन दिवशीय नवजात बालकाचा रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यामुळे उपचारासाठी नेत असताना खाजगी रुग्णालयातच उपचारापूर्वीच मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी सकाळी ८:३० च्या सुमारास घडली यादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार नाडण येथील सौ पूर्वा प्रणेश घाडी यांना दिनांक 22 मे रोजी प्रसुतीसाठी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांना दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी दुपारी ३:३० वाजता त्यांची प्रसूती होऊन मुलगा झाला. तिसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी या नवजात मुलाची शुगर कमी झाल्याने त्याची प्रकृती खालावली म्हणून त्याला उपचारासाठी कणकवली येथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. दरम्यान रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध होऊ न शकल्याने नातेवाईकांनी त्याला रिक्षाने नेले. त्यावेळी तात्काळ उपचारासाठी त्याला जामसंडे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी तेथील डॉक्टर यांनी तो मयत झाल्याचे जाहीर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा