You are currently viewing मुंबईत जाण्यासाठी निघालेल्या वेंगुर्लेतील वृद्ध महिलेचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने रेल्वे स्थानकातच निधन…

मुंबईत जाण्यासाठी निघालेल्या वेंगुर्लेतील वृद्ध महिलेचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने रेल्वे स्थानकातच निधन…

सावंतवाडी

मुंबईत जाण्यासाठी येथील रेल्वे स्थानकात आलेल्या वेंगुर्ले-मोचेमाड येथील वृद्धेचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. इंदुमती मधुसूदन गावडे (७५), रा. तरवाडी असे तिचे नाव आहे. ही घटना आज सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. ती मळगाव रेल्वे स्थानकात अचानक अत्यवस्थ पडल्याने तिला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच तिचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबतची खबर रुपेश रमेश खोत, यांनी सावंतवाडी पोलिसात दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनेची अधिक माहिती अशी की, मयत गावडे या मुलगा श्यामसुंदर गावडे व त्यांचा मित्र रुपेश खोत यांच्यासोबत मुंबई येथे जात होती. त्या साठी त्या सकाळी येथील रेल्वे स्थानकात आला. दरम्यान त्यांना अचानक अत्यवस्थ वाटू लागल्याने रुग्णवाहिकेतून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 9 =