You are currently viewing कुडाळ येथे ८ व ९ मार्चला रंगणार महिला महोत्सव…

कुडाळ येथे ८ व ९ मार्चला रंगणार महिला महोत्सव…

भाजप महिला मोर्चाचा पुढाकार; विविध स्पर्धांचे आयोजन…

कुडाळ

येथील महिला मोर्चाच्या वतीने महिला दिनानिमित्त भव्य महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ८ व ९ मार्च या कालावधीत संपन्न होणार आहे. या महोत्सवा अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धा, तालुकास्तरीय वेशभूषा स्पर्धा, खेळ पैठणीचा, उखाणा स्पर्धा व पाककला स्पर्धेचा समावेश आहे. तरी मोठ्या संख्येने महिलांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्षा दीपलक्ष्मी पडते यांनी केले आहे.
०८ मार्चला संध्याकाळी ५.३० वाजता महिलांच्या रस्सीखेच स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेस शहरातील जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेण्याचे आवाहन भाजपा महिला मोर्चा कुडाळ यांचेकडून करण्यात आले आहे. तसेच कुडाळ तालुक्यातील महिलांसाठी वेशभुषा स्पर्धा पहिल्या तीन स्पर्धकांना आकर्षक बक्षीसे, तसेच महिलांसाठी पाककला स्पर्धा मेनु -थालीपीठ (भाज्यांपासून), तसेच सौभग्यवती कुडाळ (खेळ पैठणीचा) साठी भव्य आकर्षक बक्षीसे पहिल्या क्रमांकास पैठणी, दुसरा क्रमांक सोन्याची नथ, तिसरा क्रमांक चांदीचा छल्ला. विशेषकरुन यावेळी खास महीलांसाठी उखाणा स्पर्धा ठेवण्यात आली आहे. यास खास बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. पहीला क्रमांक चांदीचा करंडा, दुसरा क्रमांक चांदीची पैंजण, तिसरा क्रमांक चांदीची जोडवी तसेच सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू तर विशेष आकर्षण महीला ढोलपथक, निमंत्रीत ग्रुप डान्सचा नजराणा, प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ, खाऊगल्ली, आकर्षक फटाक्यांची आतषबाजी विशेष म्हणजे प्रत्येक प्रेक्षकांना प्रश्नमंजुषा घेण्यात येईल त्यातील स्पर्धकांना चांदीची नाणी देण्यात येणार आहेत. या सर्व स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − seven =